सुजाता राणे

मीनाक्षी पाटील यांचे ‘इज इट इन युअर डीएनए’आणि ‘ललद्यदस् ललबाय’ हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ‘इज इट इन युअर डीएनए’ या कवितासंग्रहात ‘मी’चा अखंड वाद-संवाद अगदी अखिल विश्वापासून थेट ईश्वरापर्यंत कसा सुरू आहे ते दिसून येते. ‘ललद्यदस् ललबाय’ या शीर्षकातूनच चौदाव्या शतकातील काश्मिरी शैवसंत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या तत्त्वज्ञानाचा कवयित्रीच्या कवितांवर असणारा प्रभाव दिसून येतो.
या दोन्ही संग्रहातील कविता या गर्भाशयापासून आकाशगंगेपर्यंतच्या अवकाशाला व्यापून उरणारी आहे. कवयित्री आपल्या स्वत:शीच चाललेल्या ‘शोधणे’ व ‘हरवणे’ या क्रियांचे वर्णन करताना मूलाधार, सहस्त्रार, सुषुम्ना या आध्यात्मिक संज्ञांपासून ते मार्क्स, फ्रॉईड अशा भारतीय व पाश्चात्त्य अनेक विचारसरणींचे संदर्भ लक्षात घेते. वाचकांना त्यामुळे वैचारिक-मानसिक अवकाशाचाही व्यापक पट अनुभवता येतो.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

या कवितांमध्ये स्त्रीची पुरातन काळापासून आतापर्यंतची विविध रूपे येतात. कवयित्रीचे या स्त्री रूपांच्या अनुषंगाने स्वत:च्या आतील व बाहेरील घर्षणाची स्पंदने टिपण्याचे प्रयत्न लाजवाब आहेत.‘इज इट इन युवर डी एन ए’ हे कवितासंग्रहाचे शीर्षक असणारी दीर्घ कविता या संग्रहात शेवटी येते. मुंबईसारख्या महानगरातील संघर्षकाळ यात पूर्वार्धात येतो. याच कवितेतील‘बाईला ‘वस्तू-साधन’ समजणारा पुरुषस्वत:च कधी झालाय वस्तू्’ हा नवा विचार महत्त्वाचा वाटतो.

‘ललद्यदस् ललबाय’ या संग्रहातील कविता ‘आत’, ‘बाहेर’, ‘आत- बाहेर’, ‘आतआतआ ऽऽऽ त’ अशा चार भागांमध्ये विभागल्या आहेत. या कवितांमधून ‘प्रवासा’चे मेटाफर वारंवार येते. हा प्रवास कधी व्यक्तीचा समष्टीशी संबंधित तर कधी व्यक्तीच्या स्वत:शीच सुरू असलेल्या वाद-संवादाशी संबंधित आहे.
बाजारपेठीय व्यवस्थेत स्त्रीचे वस्तूकरण करणाऱ्या विविध प्रतिमांची जंत्री ‘बयो’सारख्या कवितेत मुळातून वाचण्यासारखी आहे.
‘बयो, बस झाला गं खेळ आता हा लुटीपुटीच्या झटापटीचा युगे अठ्ठावीसचा ३६ -२४ -३६ इंचाचा कितीही मोजलं तरी उरशीलच की गं दशांगुळं म्हणूनच आता तरी घुंगट के पट खोल गं बयो घुंगट के पट खोलअन् कडकडून भेट गं स्वत:ला!!’ हा आव्हानपूर्ण शेवट महत्त्वाचा ठरतो. ‘ऊब’मध्ये अवहेलनेच्या अनुभवांमुळे हार न मानता आपल्यात असणारी ठिणगी जपणे महत्त्वाचे आहे, याची जाणीव कवयित्रीने वाचकांना करून दिली आहे. ही ठिणगी वेधक, मंद, गुलाबी प्रकाश देणारी आहे. येथे ज्ञानेश्वरांशी या कवितेची नाळ सहज जुळते. ‘मुंगी उडाली आकाशी’मध्ये स्त्रीलिंगी मुंगीला वेळोवेळी मारण्याचे प्रयत्न केले गेले ‘तरीही त्या येतच राहिल्या झुंडीच्या झुंडीने’ सारखी कल्पना दुर्दम्य आशावाद व्यक्त करते.

अनादी काळापासूनच्या या अंतर्बा द्वंद्वांमुळे अस्वस्थ असे कवीमन कधी हळुवारपणे तर कधी उपरोधाने मानवी समाजातील सार्वकालीन व्यवस्थांना अनेक प्रश्न विचारते. ‘ईव्ह’ आणि ‘अॅडम’ ते आताचा काळ, सर्व संस्कृतींत पुरुषी वर्चस्वाचाच पगडा कसा काय स्वीकारला जातो? स्वत:च्या संदर्भात-
कोणत्याही काळात कायमच जाणवणारं स्वत:चं आउटडेटेडपण कळत नाहीयेकाय करावं स्वत:चं?’ यांसारखे अनेक प्रश्न या कविता उपस्थित करतात.
‘कोमात गेलेली ती’, ‘हरवलेली ती’, ‘म्युझियम पाहायला गेलेली ती’, ‘हल्ली मला दिसत नाहीय’ यांसारख्या कवितांमध्ये स्वत:चेच स्वत:पासून अलग होणे, आपले टोकाचे एकाकीपण अशा सार्वत्रिक आशयाचे सूचन करण्यासाठीच जणू सर्वनामांचा वापर केला आहे.

झुंडीच्या मानसशास्त्राने आदर्शवादाचा एकटा आवाज पद्धतशीरपणे दडपून टाकणे, जाहिरातींचा प्रभाव, सगळंच विकाऊ असणे, दुसऱ्याला शेकोटीत ढकलून स्वत: ऊब घेणे यांसारख्या बाहेरच्या व्यवस्थेतील स्वार्थाचे – शोषणाचे- फोलपणाचे झगझगीत दर्शनही कवितांमध्ये घडते.
‘ललद्यदस् ललबाय’ या कवितासंग्रहात घराचे हरवलेपण- त्याच्या शोधासाठीची होणारी घालमेल, सतत पळत राहणे इ.बा प्रतिमा- रूपकांच्या साहाय्याने अनादी काळापासूनची आध्यात्मिक अनुभूतीसाठीची तगमगही व्यक्त होते. पुढे अपार करुणेपर्यंत झालेल्या ‘मी’चे दर्शनही येथे यशस्वीपणे घडते.
‘आता मी गाते अखंड गाणंनिराकार घराचं विश्वाच्या आकाराचं एक तानतेनं साऱ्या आरोह आवरोहांसकट ललद्यदस्सारखं’ अशा ओळींमधून ती विश्वात्मक जाणिवेने लल्लेश्वरीच्या तत्त्वज्ञानाशी वाचकांनाही सहज जोडून टाकते. प्रचलित म्हणी, वाक्प्रचार, गाणी, लोककथा इ. ची केलेली चमत्कृतीपूर्ण पुनर्रचना हे मीनाक्षी पाटील यांच्या कवितेचे एक लक्ष्यवेधी भाषिक वैशिष्टय़ आहे. उदाहरणार्थ ‘एव्हढे पोखरूनही मात्र/ निघाला नाही एकही उंदीर’ ही ‘अवशेष’ कवितेतील रचना. पारंपरिक गोष्टींचा साचा बदलून गोष्टींचे नवे रूप सांगणाऱ्या या कविता वाचकांना भाषिक- बौद्धिक आनंदही पदोपदी देतात .

मिर्झा गालिब, दाली, वेटिंग फॉर गोदो इ . कलाकार, कलाकृती यांच्या संदर्भानी ही कविता कलात्मक संदर्भ जागे करून आशयाला अधिक गडद करते.
‘नाममात्र उत्खनन’मध्ये-
‘हजारो वर्षांची तजवीज करून
साखळदंडात बांधलेल्या
स्वतंत्रतेच्या ममीवर मात्र
साठत जातात धुळीचे थरांवर थर
निर्विकारपणे बघत राहते नाईल
सारी धूळधाण कोरडय़ा डोळय़ांनी
आणि इकडे गंगेला मात्र येतोय माणसांचा पूर
वाहत जातोय थेट यमुनेच्या महालाखाली
आणि ‘आता तुझी पाळी’ असं टाळी देऊन उस्ताद म्हणताहेत,
वाह, ताज बोलीये जनाब ताज!’ या ओळींतून मानवी संस्कृतीचे पुरातनपण फोल ठरून आज जाहिरात युगात या सांस्कृतिक खुणांचा वापर कसा केला जात आहे ते चपखल भाषेतून दाखवून दिले आहे. एक भाषा दुसऱ्या भाषेशी बोलायला कोणती भाषा वापरत असेल सारखी ‘अभिजात’ भाषेसंदर्भातील कविता छान जमून आली आहे. ‘जयंतदा’सारखी जयंत पवार यांच्यावरील तरल व भावोत्कट शब्दांतील कविता जयंत पवारांवर, त्यांच्या लेखनावर मनस्वी प्रेम करणाऱ्या वाचकांनी मुळातून वाचायलाच हवी.

दुसऱ्या संग्रहाच्या ‘आतआत आऽऽऽ त’ या शेवटच्या भागात चार कविता आहेत. तृष्णेचं ‘अक्षयपात्र’, आत्मशोधाच्या प्रक्रियेतील ‘निश्चल’अनुभूती, ‘कालाय तस्मै नम:’ म्हणतानाच हजारो वर्षांपासूनचा ‘मी’चा प्रवास. या ‘मी’ची आहे-नाही, जन्म-मृत्यू, आसक्ती-विरक्ती, स्त्री-पुरुष अशा विविध द्वंद्वातून होणारी ही अनादी-अनंत भटकंती व्यक्त करण्यात कवयित्री यशस्वी झाली आहे. दोन्ही काव्यसंग्रहांची मुखपृष्ठे या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे परिणामकारक सूचन करतात. आजची कवयित्री सातशे वर्षे जुन्या लल्लेश्वरीशी कशी जोडली जाते ते या कवितांच्या माध्यमातून निश्चितच अनुभवण्यासारखे आहे.

‘इज इट इन युअर डीएनए’ , ‘ललद्यदस् ललबाय’, मीनाक्षी पाटील,
पोएट्रीवाला पेपरवॉल पब्लिशिंग,

अनुक्रमे पाने- ७४, किंमत- २५० रुपये.
पाने- १०५, किंमत- २५० रुपये.
sujatarane31 may@gmail. com