मेधा पाटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रमजीवींसह कार्यरत देशभरातील कार्यकर्त्यांना आपले बुद्धिजीवीत्वही नव्हे, तर आपले लेखन-वाचनही अनेकदा बाजूला ठेवूनच आव्हान झेलावे लगते; ते सातत्य आणि चिकाटीचे, कर्तव्यकठोरतेबरोबरच वैचारिक अभिव्यक्तीचे! श्रमाच्याच आधारे जगणाऱ्यांना शिक्षणापेक्षाही रोजीरोटीचा ठेवाच अधिक मोलाचा काय, अमूल्य वाटतो आणि अशा समुदायांसह त्यांचे जगणे-मरणे पाहत, स्वत:च्या आयुष्यात कमी अधिक ओढून घेणाऱ्यांनाही आपले सुशिक्षितपण विसरून जगावे लागते. गांधींच्या शिक्षणाविषयी संदेशात मूलभूत शिक्षणाचा उद्देश हा मन, मेंदू आणि मनगटाचा विकास हाच सूचित आहे, केवळ कागद आणि कलमाची करामत नव्हे! मनाचा विकास हा संवेदनेवर आधारभूत असल्याने तो वेदनेला साद देत होत असतो, तर मेंदूचा विकास म्हणजे बुद्धिनिष्ठा जपण्याबरोबरच विवेकाची कास धरणारा असावा लागतो. या दोन्हींची सांगड मनगटाच्या जोरावर आपली जीविका टिकवणाऱ्यांशी घालणे शक्य होते ते ‘श्रमप्रतिष्ठे’च्या मूल्याइतक्याच भावानुभवावर! श्रमजीवी आणि बुद्धिजीवी यांच्यामधील हे नाते जडत-घडत जाते ते श्रमजीवींसह जगत असतानाच आपली लेखणी चालवत राहण्याने, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अखेर आपल्या कार्यानुभवाची साद इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी ती कागदच काय, विविध माध्यमांतून उमटणे हे गरजेचे असते, याच विचारातून मी स्वीकारले. अनेक प्रस्तावांना अनेक वर्षे नाकारल्यानंतरच, ‘लोकरंग’ मधील रविवारचा हा स्तंभ लिहिण्याचे आव्हान! सारी अनिश्चितता, कार्यव्यस्तता आणि शिस्तबद्धतेविषयीचे, बांधिलकीचे भय मनभर दाटलेले असतानाही- श्रमजीवींच्या आयुष्याचे धागेदोरे तरी या निमित्ताने विणता येतील का? साऱ्या वाचकांच्या विचारांवर त्याची पांघर घालता येईल का? हा आणखी एक प्रश्न. स्वत:ची सारी मर्यादा समजून, सोबत घेऊनच या स्तंभलेखनातून उत्तर देत गेले, स्वत:साठीही!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang narmada movement medha patkar abn
First published on: 29-12-2019 at 04:34 IST