श्रीनिवास बाळकृष्ण
पोटलीबाबा या सुट्टीत काय करणार आहे माहित्येय? एका जाड कागदावर पेन्सिलने वर्तुळ काढणार. ते वर्तुळ कितीही छोटं-मोठं असू शकतं. ते व्यवस्थित कापणार! ही झाली माझी जेवणाची कागदी थाळी. अगदी याच आकाराचे आणखी पाच-दहा, पण थोडय़ा पातळ कागदावर वर्तुळं काढणार आणि कापणार व आकृतीत दिसतं तसं र्अध कापून जाड वर्तुळावर चिकटवणार. हे करायचा कंटाळा आला असेल तर सरळ बाजारातून कागदी प्लेट आणणार. आणि त्याचे अर्धे भाग करून एका उघडय़ा मोठय़ा चपातीवर पाच र्अधचपात्या घडी करून ठेवू तशा चिकटवणार.
डाव्या बाजूच्या अध्र्या पानांवर भाज्यांमध्ये कारलं, पडवळ, गवार, सिमला मिरची, भाकरी, उकडलेली अंडी, शेंबडी भेंडी, तुरुतुरु खेकडा, तळलेला बांगडा इत्यादी पदार्थ काढणार. दुसऱ्या बाजूला ‘हेल्दी फूड’मधलं लॉलीपॉप, तंदुरी, बोंबिल, कोळंबी, पाव, पिझ्झा, बर्गर, फळं असे पदार्थ काढणार. ते मस्त रंगवणार. काढता येत नसेल तर त्याचे फोटो कापून चिकटवणार. आणि मग एकेक फ्लॅप उघडून, दुसरा बंद करून चिक्कार ऑड कॉम्बिनेशन्स बनवणार आणि अनेकांना दाखवणार. लोकांना आवडणारी कॉम्बिनेशन्स लिहून ठेवणार. ती सर्व एका मेन्यू कार्डात साठवणार. त्या पदार्थाचे एक मस्त हॉटेल सुरू करणार..
कशी आहे कल्पना? तुम्ही याल ना खायला?
shriba29@gmail.com