अरुंधती देवस्थळे

नेमकं काय होतं या जिनिअसच्या मनात कलेसंबंधी? मायकेलएंजेलोच्या मनोगताची एक झलक : What the artist seeks to achieve with the greatest work and with the greatest diligence, in the sweat of his brow, is that everything he produces with the greatest effort should look as if it had been created quickly, almost effortlessly, indeed with the greatest of ease – whatever the truth of the matter… and the essential principal remains : to expend heavy effort and nevertheless create something weightless.(1538)
‘डेव्हिड’ला लागूनच आलेल्या Doni Tondol (दोनी ठांडा) या टेम्पेरा पॅनल पेंटिंगची (१५०४) खूप वाहवा झाली. हे १२० सें. मी. व्यासाच्या गोलाकारात काढलेलं चित्रं मेरी, जोसेफ आणि बाळ जीजसचं, निसर्गाच्या पार्श्वभूमीवर आनंदी चमकदार रंगातलं. याने शिल्पकार मायकेलएंजेलोची चित्रकलेवरही उत्तम पकड असल्याचं दाखवून दिलं. यानंतर मिळालेलं मोठं काम म्हणजे फ्लॉरेन्सच्या गौरवार्थ पलाझो वेकिओच्या भिंतीवर काढायचं Battle of Cascina (पेन अॅण्ड इंक १८ २५ सें.मी.) हे चित्रं. लिओनार्दो द वंचीच्या भिंतीसमोरची भिंत. लिओनार्दोने Battle of Anghiari मध्ये युद्धभूमीवरील रणधुमाळी दाखवली होती. दोन्ही कलाकारांच्या चित्रांतून (१५०६) दोघांची दृष्टी आणि शैली यातला फरक स्पष्ट दिसत होता. मायकेलने युद्धाआधी सैनिकांनी घाईघाईने तयार होण्याचा क्षण निवडला होता, तर अनुभवी लिओनार्दोने आक्रमक धुमश्चक्री. तुलनेत सगळीकडून लिओनार्दोचं चित्रं प्रशंसेला पात्र ठरलं होतं, पण ते काही वीस वर्षांनी लहान असलेल्या अहंभावी मायकेलएंजेलोला सहन झालं नव्हतं.

NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर
article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट! 
Aditya Roy Kapur Attended Alanna Baby Shower
अनन्या पांडेच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचला बॉयफ्रेंड आदित्य कपूर, व्हिडीओ आला समोर

इथे आल्यावर आता स्मृतिस्थळ झालेलं मायकेलएंजेलोचं घर ‘काजा ब्यूनॉरेती’ या गॅलरीजवळच आहे तेही पाहूनच घ्यावं, त्यात त्याची ‘Bacca’ आधीची शिल्पं आहेत. ती या प्रशस्त घरात त्याच्या खोलीत अजून तशीच ठेवली आहेत. तशीच ‘Madonna of the Stairs आणि ‘Battle of Centaurs’ ही दोन्ही शिल्पं मांडून ठेवली आहेत. या दुमजली महालासारख्या वास्तूत अनेक प्रदर्शन कक्ष आहेत. त्याची दीडशे चित्रं, रेखाचित्रं आहेत- जी कुठेही प्रसिद्ध न झाल्याने आपल्याला इथे आल्यावरच कळतात; आणि निर्मितीचा आवाका बघून त्याच्याबद्दलचा आदर दुणावतो.

१५०५ मध्ये त्याला पोप दुसरे ज्युलिअस यांनी स्वत:च आपल्या भव्य कबरीचं काम दिलं. यांचं राफाएलने केलेलं तैलचित्रं (१५११-१२) लंडनच्या नॅशनल गॅलरीत लावलेलं आहे. हे काम इतकं रेंगाळलं की त्याचा उल्लेख tragedia della tomba (कबरीची शोकांतिका) असा होऊ लागला. समकालीन चित्रकार फॉन्तबॉनने पोपसमोर गुडघे टेकून मायकेलएंजेलो माफी मागत आहे असं चित्रं काढलं होतं, हेही चित्र काजा ब्युनोरेतीमध्ये लावलेलं आहे. कबरीची डागडुजी झाल्यानंतरच्या छायाचित्रांत त्यातील पुतळय़ाचं कोरीव सौंदर्य आणि सजावटीचे बारकावे लोकांसमोर आले. इथे मायकेलएंजेलोची शैली परिपक्वतेला पोहोचलेली. विशेषत: त्यासाठी कोरलेला संगमरवरातला मोझेसचा २३५ सें.मी. उंच रुबाबदार पुतळा. त्याची छातीवर रुळणारी कुरळी दाढी, तिच्यात हात खुपसल्यामुळे हातांवर दिसणाऱ्या शिरा, एकसारखी कापलेली नखं, कमावलेलं शरीर आणि पायघोळ पोशाखावर पडलेल्या सुरकुत्या, याच्यावर मायकेल चार र्वष काम करत होता. मोझेसला डोक्यावर दोन शिंगं आल्यासारखी दिसतात, पण ते ज्ञानाचे प्रतीक आहेत हे कॅटलॉगमधून कळतं. क्रिस्तोफ फ्रॉमेल लिखित Michelangelols Tomb for Julius II : Genesis & Genius या पुस्तकात कबरीवरले १५ पुतळे आणि वेगवेगळय़ा भागांची ८०हून आधिक चित्रं पाहायला मिळतात. चाळीस र्वष कूर्मगतीने चाललेला प्रकल्प १५४५ मध्ये एकदाचा पूर्ण झाला आणि मायकेलएंजेलोने सुटकेचा श्वास घेतला. पोपच्या लव्ह-हेट मैत्रीचं ऋण मायकेलने पुरेपूर फेडलं! जिथे सामान्यजन पोपला वचकून असत तिथे मायकेलएंजेलोसारखे कलाकार बरोबरीने भांडत हे महत्त्वाचं!

वॅटिकन सिटीमधल्या १५व्या शतकातल्या सिस्तीन चॅपलला आज जे कलाजगतातल्या आश्चर्याचं स्थान प्राप्त झालंय ते फक्त मायकेलएंजेलोच्या अफाट भित्तिचित्रांमुळे. याबद्दल जर्मन लेखक गूटे लिहितात :Until you have seen Sistine Chapel you have no adequate conception of what man is capable of accomplishing… here, above onels head and before onels eyes is living evidence of what one man has done. ल्लिी. त्याच्या अविश्वसनीय वाटावं अशा योगदानाआधी सांद्रो बोटीचेली, डॉमिनिको गिरलंदायो, पिएत्रो पेरूगिनो, कॉसिमो रॉसेली, लूका सिनोरेलीसारख्या रेनेसान्सच्या चित्रकारांना पुनर्बाधणी झालेल्या भव्य चर्चमध्ये भित्तिचित्रं बनवायला आमंत्रित केलं गेलं होतं. या भिंती १० फूट जाडीच्या. त्यांनी दोन समोरासमोरच्या भिंतींवर मोझेस आणि जीजसच्या आयुष्यातले काही प्रसंग रंगवले होते आणि तोवरच्या पोपची पोट्र्रेट्सही. त्यांचं काम १४८२ मध्ये संपलं. मग आल्टरमागची भिंत आणि वॉल्ट्सवर चित्रं काढण्यासाठी मायकेलएंजेलोला पाचारण करण्यात आलं. एकतर ओल्या गिलाव्यावर काम करण्याचा अनुभव व आत्मविश्वास त्याला नव्हता, शिवाय कामाची भव्यता छाती दडपणारी. हे काम आपली आजवरची प्रतिष्ठा धुळीस मिळवेल म्हणून त्याने ते नाकारायचा प्रयत्न केला आणि शेवटी एकूण १२०० चौ. मी.च्या आसपास, वेगवेगळय़ा भौमितिक आकारात विभागलेल्या पृष्ठभागांवर चित्रं काढण्याचं आव्हान स्वीकारलं. मूळ प्लॅननुसार १५०८-१५१२च्या दरम्यान हे पूर्ण करायचं होतं. छत किंवा उंच भिंतीवर रंगवण्यासाठी मायकेलएंजेलोने उंची कमी-जास्त करता येईल असं मचाण बनवलं होतं, त्यावर बसून किंवा आडवा पडून तो चित्र काढत/ रंगवत असे. रंग बनवून देणे, भिंत साफ करून देणे, भिंतीवर चित्र छापून देणे ही कामं सहायक कलाकार करत. खाली चर्चचे व्यवहार, प्रार्थना वगैरे चालूच असत.

सर्वात शेवटी आल्टरच्या मागे त्याने ‘The Last Judgement (१७ १३.३ मीटर (१५३६-४१) हे ख्रिस्ताच्या पुनरागमनाचं दृष्य चित्रित केलं आहे. या चित्रात ३०० आकृती आहेत. देव, देवदूत, जीजस, संत, तरून स्वर्गात गेलेले आणि बाकी धरतीवर पाठवले गेलेले. त्यानुरूप चेहऱ्यांवर आनंद/ शांती/ निराशा/ भय अशा भावना. जे वाटय़ाला आलंय ते स्वीकारून मंडळी कामाला लागलेली. मूल्यवान लापीस लॅझुलीने बनवलेला निळा. त्याच्या छटांच्या आकाशाखाली तरंगणारे विश्व. छतावर रंगवलेल्या बायबलमधील कथांत ‘Creation of Evel, kThe Fall & expulsion from Paradisel, kThe Flood l, kDivision of Light from Darkness’ यांसारखी लांब-रुंद चित्रं आहेत. १५४० पर्यंत चित्राचा वरचा अर्धा भाग अनावृत करण्यात आला. त्यानंतर मायकेल मचाणावरून पडल्याने त्याचा पाय जायबंदी झाला. पण वैद्यांकडून कमीतकमी उपचार घेऊन तो कामावर रुजू झाला आणि १५४१ मध्ये त्याने हे काम पूर्ण केलं. १९९४ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारात मूळ चित्रांत विवस्त्र असलेल्या अनेकांना अतिशय कुशलतेने वस्त्रांकित करण्यात आलं. सिस्तीन चॅपलमधील या चित्रांचा अभ्यास करणाऱ्याला इवोन पॅरीस यांनी लिहिलेलं ‘Michelangelo’’ हे पुस्तक अगदी सविस्तर माहिती देणारं. एक अजोड शिल्पकार म्हणून मायकेलएंजेलोने स्वत:ची कारागिरी जगाला दाखवून दिलीच होती. सिस्तीन चॅपलमधील या चित्रांनी त्याने एक अद्वितीय चित्रकार म्हणून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. अर्थात त्याच्या प्रत्येक मास्टरपीसला टीकेचा सामना करावा लागला. मुख्यत: असूयेपोटी आणि काही नियम भंग केले म्हणून केलेली हाकाटी, मनस्ताप त्याच्याही वाटय़ाला भरपूर येत राहिला!

मायकेलएंजेलोने तीनशेच्या आसपास कविता लिहिल्या आहेत- गंभीर प्रकृतीच्या. विषय बायबलमधले संदर्भ, कला, निसर्ग, आयुष्याबद्दल चिंतन आणि प्रेमावर सुनीतं (सॉनेट्स). त्याचा एक इंग्लिशमध्ये अनुवादित संग्रह प्रकाशित झाला आहे. तेराव्या शतकातल्या आधिभौतिकतेवर la Commedia (kThe Divine Comedyl) सारखं दीर्घकाव्य लिहिणाऱ्या अलिगेरी डांटेसाठी इटालियन बुद्धिवादी वर्गात खास आपलेपण आणि त्यातूनच आलेली ही एका अद्वितीय कलाकाराची, एका तशाच ताकदीच्या कवीला आदरांजली (इंग्लिश अनुवाद एच. डब्लू. लॉगफेलो)

Dante
What should be said of him cannot be said;
By too great splendor is his name attended;
To blame is easier than those who him offended,
Than reach the faintest glory round him shed.
this man descended to the doomed and dead
For our instruction; then to God ascended;
Heaven opened wide to him its portals splendid,
Who from his country’’ s, closed against him, fled.
Ungrateful land! To its own prejudice
Nurse of his fortunes; and this showeth well
That the most perfect most of grief shall see.
Among a thousand proofs let one suffice,
that as his exile hath no parallel,
Ne’ er walked the earth a greater man than he.

तो काळ फ्लोरेन्समध्ये सामाजिक-राजकीय उलथापालथीचा. कंटाळून शेवटची काही र्वष मायकेलएंजेलो रोममध्ये राहायला आला. ‘The Crucifixion Of Peter आणि ‘The Conversion of Paul ही त्याने काढलेली वयाच्या सत्तरीतली मोठी चित्रं. आता आपण थकल्याचं त्यानं मित्र वासारीला बोलून दाखवलं होतं.. अंत जवळ आल्याचं कळत होतं हे अखेरच्या लेखनातही जाणवतं. यानंतर त्याने शारीरिक श्रम न लागणारी स्थापत्याची कामं केली, पण आजवर अस्तित्वच असलेल्या कलेतही मन रमत नव्हतं. अनेक प्रियजनांचे मृत्यू पाहावे लागले होते. स्वत:वर खर्च न करणाऱ्या या थोर कलाकाराच्या रोमच्या छोटय़ाशा घरात, इहलोकीची यात्रा संपल्यावर, त्याच्या पलंगाखाली एक सुवर्णमुद्रांनी भरलेली पेटी मिळाली होती. ‘त्याला पिट्टी पॅलेस सहज खरीदता आला असता,’ असं कोंडिवीनी नमूद केलं आहे.
पण त्याहूनही महत्त्वाचे- त्याचे शेवटचे शब्द होते- ‘I am still learning… warundhati.deosthale@gmail.com
(समाप्त)