वायदा!

मिस्टर नटवरलाल- जे की अमिताभ बच्चन यांची, तसेच महाकवी आनंद बक्षी यांच्या काव्यातील त्या वाघाची क्षमा मागून सादर करीत आहोत- आमचाही एक वायदेबाज किस्सा..

(मिस्टर नटवरलाल- जे की अमिताभ बच्चन यांची, तसेच महाकवी आनंद बक्षी यांच्या काव्यातील त्या वाघाची क्षमा मागून सादर करीत आहोत- आमचाही एक वायदेबाज किस्सा..)
मेरे पास आवो मेरे मित्रोंlok01
एक किस्सा सुनो

(अंहं. सेल्फी नै काढायची!
सिर्फ किस्सा सुनो..)

कई साल पहले की बात है
काही वर्षांपूर्वीची..?
नाही, महिन्यांपूर्वीची
नाही, दिवसांपूर्वीची

उफ् ओ, पुढं तरी सरका ना..
किती दिवस मागच्याच दिवसांत अडकून राहणार?

सांगतो सांगतो..
घडी थी, हाथ था
अंधेरा मगर सख्त था
सतत दहा वाजून दहा मिनिटांचा
समय बडा कठीन था
चारी बाजूंनी साठला होता अंध:कार
त्याहून वाईट होता पोटातल्या भुकेचा मार
अखेर बदलू म्हटले दिल्लीतले सरकार
अचानक समोर आला छोटा सरदार

मी पळालो, तो धावला
मी गप्प, तो बोलला
मी चहाला, तो चर्चेला
मी टीव्हीपुढं, तो सभेला
मी ताडताड, तो धाडधाड
मी ऐकतोय, तो फाडफाड
अरे बचावलो.. बचावलो..!

तो दिल्लीत, तो गल्लीत
तो कॅमेऱ्यात, तो सेल्फीत
तो गाडीत, तो थ्री-डीत
तो झोपडीत, तो माडीत
तो आकाशात, तो पाताळात
तो ईदीत, तो नाताळात
तो भाषणांत, तो घोषणांत
‘अच्छे दिनां’च्या आश्वासनात
 
बचावलो.. बचावलो..
अरे पळा रे पळा
त्याच्या मागे पळा!

फिर क्या हुवा?

देवाची शप्पथ लई मज्जा आली
आयुष्यात माझ्या कित्ती कमळं फुलली!

कमळं फुलली?
पण ही तर सुकलीत!

अरे, हे सुकणं म्हणजे काय सुकणं आहे लल्लू?
थांब.. अच्छे दिन उद्यापासून येणार आहेत..

काँय?!   lok02                                           

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Modi selfie