बालमैफल:पैसे, खर्च आणि हिशेब

एक तारीख असल्याने सगळ्यांच्या पगाराची पाकिटे भरून टेबलावर ठेवलेली होती.

संध्या ठाकूर
एक तारीख असल्याने सगळ्यांच्या पगाराची पाकिटे भरून टेबलावर ठेवलेली होती. सकाळीच सफाईवाले काका आले, त्यांना त्यांचे पाकीट दिले. काम संपल्यावर नीताताईचं पाकीट आईने तिच्या हातात दिल्यावर अवंतीने प्रश्न केला, ‘‘काय करणार तू या पैशांचं?’’ नीता हसली. अशा प्रश्नाची तिला सवय होती. त्याचं उत्तर द्यायलाही तिला आवडायचं.
‘‘डाळ, तांदूळ, भाजी.. जेवण बनवायला जे लागतं ते आणीन. घरभाडं, वीज, पाणीबिल वगैरे..’’ मोठी यादी सांगितली तिने.
मग इस्त्रीवाले काका आले. त्यांनाही विचारलं, ‘‘आप क्या करते हो ये पैसे से?’’ त्यांचं उत्तरही साधारण नीताताईसारखंच होतं. शिवाय ते म्हणाले, ‘‘गाव में भेजता हूं पैसे. बीबी, बच्चे वहॉं पे है.. उनके खर्चे के लिये.’’
बाबाला पुढच्या हवामानाचा अंदाज आला होता. पूर्ण तयारीनिशी दोघे हिशेबाची वही घेऊन बसले अवंतीसोबत. घरात लागणाऱ्या वस्तूंची यादी, शाळेचा खर्च, घराचा हप्ता.. पगाराच्या स्लीपवरून पगार कापून किती पैसे घरात येतात, किती लागतात याचा हिशेब झाला.
‘‘तरी बरेच उरताहेत..’’ अवंतीचा प्रश्न.
‘‘अवंती, आपण नीताताईच्या राहुल आणि यशवंतच्या शिक्षणाची व्यवस्था बघतो. गावातल्या होतकरू मुलांना वार्षिक सहलीसाठी पैसे, लग्नसमारंभ, भेटवस्तू, अनपेक्षित खर्च अशा अनेक गोष्टी असतात.’’
अवंतीच्या डोक्यात प्रकाश पडला. घरात किती पैसे आणि कुठून, कसे येतात, त्यांचा विनियोग कसा होतो हे सारे तिला समजले. आई-बाबांचे कष्ट तिला जाणवले.
‘‘आणि लॉकडाऊनमध्ये हे लोक येत नव्हते तेव्हा..?’’
आई मधेच म्हणाली, ‘‘तेव्हाही सगळ्यांचे पगार देत होतो की आपण! तसेच आपले नेहमीचे रिक्षावाले काका, उबर टॅक्सीवाले काका, सुतारकाम करणारे..’’
अवंतीच्या हृदयाच्या एका कप्प्यात संस्कारबीज रूजत होतं.
sandhyajit@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money expenses accounts salary wallets weather forecast amy

Next Story
कस्तुरीगंध: ब्राह्मणशाहीचा बळी : ‘दुसरा पेशवा’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी