‘प्रगतीचा प्रशस्त मार्ग’ हा डॉ. अद्वैत पाध्ये यांचा लेख अतिमहत्त्वाकांक्षी पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. कुठलीही स्पर्धा म्हणजे आपल्यातील शक्यता आणि मर्यादा आजमावण्याची उत्तम संधी असते, हा हेतू स्पर्धक लक्षात घेत नाहीत. कोवळ्या, संस्कारक्षम मुलांना पुढील आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत स्पध्रेला तोंड द्यायचे आहे, म्हणून त्यांचे फुलण्याचे वय अक्षरश: चुरगळून टाकणारे पालक त्यांच्यावर अन्याय करीत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. ‘जे करायचे ते अत्युत्तम, स्पर्धा गाजविणारे, अन्यथा नाही!’ ही वृत्ती नुसती घातकच नाही, तर कलेचा व्यासंग वाढवू पाहणाऱ्या कलाकारासाठी मारकही आहे. स्पर्धा जिंकण्यामागे पसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या गोष्टींची लालसा असतेच; परंतु दुसऱ्याला कमी लेखण्याचा छुपा आनंदही असतो. लेख आवडला. सोबतचे चित्र तर फारच कल्पक!
– मेधा गोडबोले, विलेपार्ले.

अनुकरणीय ‘स्वधर्म’
‘धर्म सोडा, धार्मिक व्हा!’ हा डॉ. राजीव शारंगपाणी यांचा लेख आवडला. शीर्षक वाचून जी विचारशृंखला सुरू झाली ती लेख वाचल्यानंतरही थांबलेली नाही. यातील ‘स्वधर्म’ ही संकल्पना खूपच आवडली. स्वधर्मात स्वत:चे नियम असल्याने ‘..खतरे में’ वगरेचा आपल्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘जे जे बुद्धीस पटेल ते योग्य, जे पटणार नाही ते अयोग्य’ या तत्त्वाचा अंगीकार केल्यास स्वधर्माचे नियम तयार करता येतील. या लेखातील डॉ. शारंगपाणी यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्तन ठेवले तर आयुष्य खरोखरच सुखासमाधानात जाईल.
– तुषार म्हात्रे, पिरकोन.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

भाषेतून समाजोपयोगी क्रांती
१८ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मध्ये ‘भाषा’ या विषयावर महत्त्वपूर्ण चिंतन करण्यात आले आहे. ‘भाषा सर्वेक्षणानुभव!’ हा अरुण जाखडे यांचा लेख त्यांच्यातील अभ्यासक, भाषाप्रेमी संपादकाचे दर्शन घडवतो. डॉ. गणेश देवी यांचे संशोधक म्हणून असलेले कार्य महान आहेच, पण त्यांच्या वक्तव्यातून आणि अभ्यासातून दोन महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्या आहेत आणि ज्याचा संबंध केवळ भाषा जगण्याशी नाही, तर तो आपल्या जगण्याशी, आपल्या उज्ज्वल भविष्याशी आहे.
भाषा हे आपले आíथक बलस्थान होणार आहे, भांडवल होणार आहे, ही काहींना भविष्यवाणी वाटेल; पण आपल्या वेशीशी याचे पडघम एव्हाना वाजू लागले आहेत. नुकतीच गुगल इंडियाच्या प्रमुखांची मुलाखत वाचनात आली. त्यात त्यांनी, स्थानिक भाषा हा आमच्या व्यवसायाचा मुख्य स्रोत राहणार आहे, असे म्हटले आहे. ‘ग्लोबल’कडून ‘लोकल’कडे होणारा हा प्रवास आपल्या भाषा जगवण्याच्या चळवळीला सक्षम वातावरण देऊ शकतो. डॉ. गणेश देवी यांनी मांडलेला आणखी एक विचार मला महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे- त्यांनी डिजिटल भाषेचा आणि आपल्या मायबोलीतून एकाच शब्दासाठी असलेल्या विविध अर्थाचा संबंध प्रस्थापित केला तर संगणकाच्या साहाय्याने अनेकविध प्रोगॅम्स तयार होऊ शकतील. शून्य म्हणजे ‘काही नाही’ आणि एक म्हणजे ‘काही आहे’ ही डिजिटल भाषेची शिस्त पाळून मराठी भाषेची गुणवैशिष्टय़े वापरून मोठय़ा प्रमाणात आज्ञावली निर्माण करता येतील. त्याद्वारे अनेक व्यावसायिक सॉफ्टवेअर्स तयार होऊ शकतील असा विश्वास डिजिटलचा अभ्यासक म्हणून मला वाटतो. आणि अशी प्रणाली तयार झाली तर विज्ञान आणि भाषा यांच्या संयुगातून निर्माण झालेली तंत्र युगातील ती एक मोठी समाजोपयोगी क्रांती ठरेल
– डॉ. केशव साठय़े, पुणे .

उत्तम लेख
जयप्रकाश प्रधान यांचा ‘अमेरिकेतले वृद्धाश्रम’ हा माहितीपूर्ण लेख वाचून अगदी भारावल्यासारखं झालं. वृद्धांचा इतका विचार! अशा उत्तम आणि अत्याधुनिक सोयीसुविधा मिळणारे अमेरिकन वृद्ध किती भाग्यवान, असं वाटलं. म्हातारपण हा आयुष्यातला नकोसा काळ असं वाटण्याजोगी परिस्थिती आपल्याकडे पाहायला मिळत असताना म्हातारं व्हावं ते अमेरिकन नागरिकांनीच असं वाटायला लावणारा हा लेख आहे. पण त्याबद्दल अधिक विचार करायला लागल्यावर काहीतरी खटकायला लागलं. जीवन स्वतंत्रपणे जगणं म्हणजेच खरं जगणं- ही अमेरिकन विचारसरणी या लेखातून समजली. अमेरिकन अर्थव्यवस्था, तिथल्या माणसांचे विचार, जीवनशैली, तिथली सामाजिक स्थिती याबद्दलची माझी माहिती केवळ ऐकीव आणि वाचलेली आहे. अमेरिकेत वयाच्या सोळाव्या वर्षी मुलं स्वतंत्र राहतात, आपली आपण कमवून शिकतात असं खूप वेळा ऐकलंय. पण आपल्याकडे तसं नाही. बहुतांश आई-वडील मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करतात. वैद्यकीय विद्यार्थी तर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त र्वष आई-वडिलांवर अवलंबून असतात. मग आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ मुलांसाठी आíथक तरतूद करण्यात घालवलेल्या, प्रसंगी त्यासाठी कर्ज काढून पुढे ते फेडत बसणाऱ्या आई-वडिलांसाठी मुलांनी थोडी तडजोड का करू नये? कृतज्ञता हे आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे.
‘आमच्या स्वातंत्र्याचं काय?’ असा प्रश्न पडलेल्या अमेरिकन वृद्धांच्या हे लक्षात आणून द्यायला हवं, की एकत्र राहिल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातील तरुण पिढीच्या स्वातंत्र्याचासुद्धा संकोच होत असतो. शंभर टक्के निर्णयस्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. घरातल्या वडिलधाऱ्यांचा विचार करूनच आपलं आयुष्य जगावं लागतं. एका घरात राहिल्यामुळे नातवंडं मोठी होताना आपली मुलं नव्याने वाढताना पाहिल्याचा आनंद मागच्या पिढीला मिळतो. त्यांच्या सहवासात तब्येतीच्या वाढत्या तक्रारी थोडय़ा विसरल्या जातात. आपण आता काही कामाचे उरलो नाही, निरुपयोगी झालो आहोत अशा निराशाजनक मनोवृत्तीवर मात करता येते. आणि त्याचबरोबर तरुण पिढीला एक सपोर्ट सिस्टीमही मिळते. बाहेर पडून नोकरी-व्यवसाय करताना मुलांजवळ त्यांचे आजी-आजोबा आहेत, या भावनेने आश्वस्त वाटतं. घर-प्रपंच चालवण्यात मागच्या पिढीची अनुभवी मदत मिळते. आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा बडेजाव न माजवता थोडी तडजोड करण्याची तयारी दोन्ही पिढय़ांनी ठेवली पाहिजे, हे भारतीय विचार आणि वास्तव अमेरिकन वृद्धांना कुणी कधी समजावून सांगितलं नाही का? बदलत्या काळाच्या रेटय़ात, स्वत:ला सिद्ध करण्याच्या कठीण काळात आई-वडिलांनी मुलांना भावनिक पािठबा आणि व्यावहारिक मदत करायला हवी, ही भारतीय मानसिकता अमेरिकन वृद्धांना कळणारच नाही असं नाही; पण त्यांना ती सविस्तर समजावून सांगितली गेली पाहिजे.
– राधा मराठे.

दिव्यांची अवस आठवली
‘बालमफल’मधील (४ ऑगस्ट) सुचित्रा साठे यांचा ‘देह जळो अन् जग उजळो’ हा लेख वाचताना ‘दिव्यांची अवस’ हा शब्द आठवला. त्यांनी ‘दीपपूजन डे’ हा कालोचित शब्द वापरला आहे. लेख वाचत असतानाच ‘आधी होते मी दिवटी’ ही कविता आठवत होती. लेखाच्या शेवटच्या ओळी याच कवितेतील आहेत. ‘आठवणीतल्या कविता- भाग २’मध्ये पान क्र. १२७-१२८ वर ही कविता आहे. या लेखाच्या निमित्ताने असे सुचवावेसे
वाटते की, आपल्या घरात ‘आठवणीतल्या कवितां’चे चारही भाग असलेच पाहिजेत. त्यातून आताच्या पिढीला जुन्या कविता वाचता येतील आणि जुन्या पिढीलाही या कविता वाचताना ‘स्मरणरंजनी आनंद’ मिळेल.
– मधुकर घारपुरे, सावंतवाडी.

माणुसकीची शिकवण
डॉ. राजीव शारंगपाणी यांचा ‘धर्म सोडा, धार्मिक व्हा!’ (११ ऑगस्ट) हा लेख खूप आवडला. मी आता वयाची ७१ वष्रे पूर्ण करेन. मला एवढेच सांगावयाचे आहे की, माझ्या पिढीला लहानपणापासूनच लोकांशी माणुसकीने वागण्याची शिकवण मिळाली. त्यामुळे समाजात वावरताना कधीच अवघड गेले नाही. माणूस जर सुशिक्षित असेल तर जगात कसे वागावे याची थोडीतरी त्याला समजूत येतेच.  
अनिल जांभेकर, ठाणे.