‘‘चार थेंब तरी पड बाबा…’’ शरीरावर घामाचे थेंब डंवरलेले असताना प्रत्येकानं आशेनं असं म्हटलं होतं आठवत असेलच प्रत्येकाला… हो ना मित्रांनो… ते थेंब आले आणि सारी सृष्टी तरारून आली. हीच किमया आहे थेंबाची. हे झालं पावसाच्या थेंबाचं, पण आयुष्यात अनेक थेंब असे असतात की प्रत्येकाकडूनच काही ना काही घेण्यासारखं असतं. अत्तराचा थेंब क्षणात तनमनाला तजेला आणतो, पण तोच थेंब ‘बुंद से गई वो हौद से नहीं आती’ अशी कान पिळणारी शिकवणही देऊन जातो. रक्ताचा थेंब हे तर जीवन आहे. गरजूंसाठी नि:स्वार्थपणे तरी दिला जाणारा रक्ताचा थेंब हे दानाचं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि ते रक्त जेव्हा थेंबाथेंबानं रुग्णाच्या शरीरात जातं तेव्हा ते संजीवनी असतं. घामाचा थेंब
तर तीन त्रिकाळ आपल्या ताटात अन्न बनून आपलं भरणपोषण करत असतो.
त्यामुळे थेंब ही नगण्य गोष्ट नाहीये. तर सातत्यानं पडणार्या थेंबांत खूप सामर्थ्य आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हे आपल्याला माहीत आहेच. उन्हात असताना थेंबात सप्तरंग दिसतात तशीच आहे थेंबाची महती… रंगीबेरंगी. थेंब आपल्याला हेच सांगतो की, आकार केवढा आहे हे महत्त्वाचं नाही अस्तित्व महत्त्वाचं!
joshimeghana.23@gmail.com
