अरुंधती देवस्थळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमूर्तवादी चित्रांमागे अमुक एक अशी विचारप्रक्रिया नसते. सोप्या, सरळ शब्दांत सांगायचं तर प्रत्येकाचा अमूर्तवाद वेगळा. बहुतेकांचा हा प्रयत्न ‘आकारातून अध्यात्माकडे जाण्याचा’ असं वाचनात येतं. सामान्यजनांना या शैलीतली चित्रं समजावून घ्यायची असतील तर गाभ्याकडे नेणारी वाट त्या चित्रकाराच्या ओळखीतून, लेखनातून सापडू शकते. अमूर्तवादी चित्रकारांत मार्क रॉथको, जोन मीरो, पॉल क्लेई किंवा पीट मोन्द्रिआनसारख्यांनी आपापल्या कलेबद्दल इतकं व्यवस्थित लिहून ठेवलंय, की ही वाट सुकर होते. चित्रं अमूर्त असली तरी त्यांच्याबद्दलचं भाष्य विरोधाभासातून वाट काढणारं असू शकतं. पीट मोन्द्रिआनचंच म्हणावं तर अगदी साधं विधान- ‘‘ Every true artist has been inspired by the beauty and colour and the relationship between them, than by the concrete subject of the picture. आणि याच्या पुढलंच विधान- अ१३ ‘‘Art is not made for anybody and at the same time, for everybody.’’ अशा प्रथमदर्शनी विरोधी वाटणाऱ्या वृत्ती मोन्द्रिआनच्या कलेतही उमटतात. विरोधाभास असून अतिशय तर्कशुद्ध, पायरी-पायरीने ( linear) झालेली शैलीची प्रगती दाखविणारे ते एक वेगळेच कलाकार वाटतात. आता कुठल्याही कलासंग्रहालयात प्राथमिक रंगांतील आयत आणि चौकोनांच्या सरळ काळ्या रेषेने विभागलेल्या लक्षवेधी मांडणीत मोन्द्रिआन भेटतात. तीच त्यांची बघताक्षणी पटणारी ओळख. पण त्यामागची कारणपरंपराही महत्त्वाची. त्यात दोन परस्परविरोधी प्रेरणा दिसतात. एका बाजूला त्यांना झपाटून टाकणारा जॅझमधला ताल (ऱ्हीदम) आणि दुसरीकडे तंत्रशुद्ध, समतोल राखणारी मांडणी मोन्द्रिआनचा (१८७२-१९४४) जन्म डच चित्रकार कुटुंबातला.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The logic behind abstraction piet mondrian mark rothko joan miro paul klee abstract painters amy
First published on: 02-10-2022 at 00:08 IST