हृषीकेश रांगणेकर dr.rangnekar@gmail.com

उत्सवप्रियतेचे काय घेऊन बसलात? आपली उत्सवक्षमता प्रचंड वाढलीय गेल्या काही वर्षांमध्ये.. आणि शिवाय विनोदनिर्मितीची आपली क्षमताही वाढलीय! बघा पटतं का..

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
The Meteorological Department warned of heat wave in Vidarbha for the next three days Pune news
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; कुठे वाढणार तापमान?
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

उठा उठा दिवाळी आली! अजुनेक सण उत्साहाभिमानगर्वहर्षांने साजरा करायची वेळ झाली. नॉस्टॅल्जिक व्हायचं झाल्यास ‘एक काळ होता’ जेव्हा घरी काही गोडधोड केलं की ‘दिवाळी आहे का?’ असं विचारलं जाई. ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी-दसरा’ या म्हणीने दसरा दिवाळीचं महत्त्वही अधोरेखित व्हायचं. पण गेल्या एकदीड दशकात साधन विपुलता आल्यामुळे असेल, खेळता पैसा मध्यमवर्गाच्या हातात आल्याने असेल, जगभरातल्या सगळ्या पदार्थाच्या रेसिपी सगळीकडे यूटय़ूबवर एका क्लिकसरशी उपलब्ध झाल्याने असेल.. वर्षभर सतत कुठले ना कुठले ‘डे’ज् साजरे करण्यामुळे असेल, गोडधोड, मिठाया बारोमास उपलब्ध असल्यामुळे असेल, एरवीही बऱ्याचदा फटाके, बॉम्ब वगैरेंचे आवाज येत राहिल्यामुळे असेल; पण दिवाळीचं सण म्हणून महत्त्व पूर्वीइतकं राहिलं नाही. आणखी एका बाबीचा उल्लेख आज या ठिकाणी करायला हवा, ते म्हणजे सतत काही ना काही साजरं करत राहण्याचा आपला सोस, की जी आता बहुधा आपली गरज बनत चाललीये.

दहा-बारा दिवसांपूर्वी एका मैत्रिणीकडून व्हॉट्सअ‍ॅपवर आमंत्रणाची इमेज आली. निकिताच्या पहिल्या वाढदिवसाच्या आमंत्रणाची. कोविड बंधनामुळं फक्त ५० जणांना आमंत्रण होतं. नो गिफ्ट्स ऑर बुकेज् होतं. निकिताला घरी आणल्याला एक वर्ष झालं. निकिता! न भुंकणारी, प्रेमळ डोळ्यांची पामेरियन.

मागच्या आठवडय़ात नळी ओढता ओढता एक मित्र बाळूमामाकडे जाऊ या म्हणत होता. मागच्या वर्षीच्या उत्सवात जाता न आल्याची त्याची खंत ही सच्ची होती. ओढून ओढून पोकळ केलेल्या नळीइतकी सच्ची. त्याच्या गाडीतून निघालो. मन जे शोधतं ते त्याला दिसतं म्हणतात (नसतील म्हणत तर आता म्हणू या). तर त्यानुसार मला सगळीकडे उत्सव दिसत होता, आणि एरवी नोंद घेतली नसती अशा फ्लेक्सची प्रकर्षांने नोंद घेतली. तब्बल ११ वर्ष वयाच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मित्रमंडळींची छबी त्यांच्या मनोहारी नावांसह झळकत होती. मला त्यांच्या छबीत भावी आमदार, भावी नगरसेवक, गेलाबाजार पंचायत समिती सदस्य, एकलव्य मारुती मंदिर ट्रस्टचे खजिनदार दिसत होते. अस्मिता आणि गौरव, अभिमान आणि फेटे फ्लेक्समधल्या चेहऱ्यागणिक ओतप्रोत होते. हे असं भविष्य समोर दिसत असल्यामुळे मलादेखील ही गोष्ट साजरी करायची खुमखुमी आली!

तुम्हाला आठवत असेलच, आपल्याकडे मागील वर्षी ‘दिवे लावा, टाळ्या पिटा’ उत्सव झाला. आपल्या उत्साही मंडळींनी उत्साहाच्या भरात डिश टीव्हीचा अन्टेना, पिंप, बादल्या, लोखंडी पत्रे यालाही थाळी समजून त्यांच्यावर घणाघात केलेले

आपण पाहिले. आमच्या कामवालीच्या अहोंनी त्यांच्या घरातली लोखंडी कॉट आपटून आणि ती ज्यावर उभी असते (किंवा आता खेदाने ‘होती’ म्हणावं लागेल) ती कोबा केलेली जमीन, दोन्ही तोडले. कापसा- कापडाच्या असल्याने कॉटवरच्या गाद्यांना तुटता आलं नाही. दिवे, मेणबत्त्या लावणे हे सामान्य वकुबाच्याच मनुष्याचे काम आहे असे समजून लोकोत्तर पुरुषांनी कागदाचे भेंडोळे, मशाली पेटवल्या. स्वातंत्र्यदिनी आपण काढतो तशी प्रभातफेरी काढत, हाती पेटत्या मशाली घेत, ढोल गजराच्या सवे ‘गो करोना गो’चा मंत्रघोष उच्चारत फेऱ्या निघाल्या. अंगात वारं संचारल्यागत जनता बेभान झाली होती. धोनीने वर्ल्ड कप जिंकून दिला तेव्हाही इतकं मंतरलेपण मी अनुभवलं नव्हतं. त्या हर्षोल्हासात कुणी स्वत:च्या राहत्या घराची पणती करू नये ही प्रार्थना मी तेव्हा मनातल्या मनात करत होतो. ‘कोविडच्या विषाणूला इंग्रजी कळत नाही’ इतकंच त्या सगळ्या जल्लोषामधून निष्पन्न झालं. अन्यथा ‘गो करोना गो’च्या आरोळ्यांनी आकाश दुमदुमलं असताना त्याने नक्कीच स्पेशल गाडी करून किंवा किमान दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या गाडीने धूम ठोकली असती. कदाचित याउलट तो सगळा उत्सव पाहून आपलं स्वागतच चाललंय अशी शंका त्याला आली असावी, अशी शंका मला नंतरचे आकडे पाहून आली हे मी या ठिकाणी नमूद करतो.   

नंतर आपण पाहिला ‘लसोत्सव.’ डार्क ुमर करणाऱ्यांना सध्या बरे दिवस नाहीत याची खात्रीच होत चालली आहे. अन्यथा लसोत्सव ही जी संकल्पना त्यांनी डार्क ुमर म्हणून एरवी सुचून वापरली असती, ती ऑफिशियली या सूर्याच्या प्रकाशात, खुलेआम घडताना आपण पाहिली. आपण खरोखरच जिथं लसोत्सव साजरा करत आहोत तिथं, आता ‘जणू आपण लसोत्सवच साजरा करत आहोत’ अशी टिप्पणी ही ‘तिरकस’ काय डोंबल राहणार! प्राप्त परिस्थितीत कोण काय डार्क ुमर पैदा करणार? कॉमन मॅन हा ‘जाने भी दो यारो’मधला सतीश शहा झालेला असताना जी काही कॉमेडी अवतीभवती चालवली आहे तिला तोड नाही. अन्यथा पात्र माणसांना आधी लस देण्याला वंचित ठेवून, लसीचा साठा करून विवक्षित दिवशीच लसी वापरून लोकांच्या जीवाशी सरकार खेळणे शक्यच नाही. बरोब्बर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी रेकॉर्ड लसीकरण आपोआप घडून नियतीनेदेखील कसे संकेत दिले आहेत पाहा. नियतीलाही सण आवडतात. 

बिनचेहऱ्याचं साजरीकरण किती ओकंबोकं असतं. नाही? ते तसं असू नये म्हणून जिथेतिथे, अगदी लसीच्या सर्टिफिकेटवरही उदार अंत:करणाने स्वत:ची छबी वापरायला परवानगी आपल्या पंतप्रधानांनी दिली. संपूर्ण जगात जी काही उदासी दाटून आहे, तिचा लवलेशही आपल्याकडे या अशा सण, उत्सवामुळे नाही हे सांगताना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात (आनंदाश्रूंनी..).     

आता कुणी नतद्रष्ट म्हणेल की, गेल्या दोन-चार वर्षांत भारतात २० कोटी लोक मध्यमवर्गातून दारिद्रय़रेषेच्या खाली गेले, भुकेचा निर्देशांक घसरला, बेरोजगारी चरम सीमेवर आहे, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, भाज्या, स्टील, सिमेंटादी वस्तू फार महागल्या आहेत वगैरे वगैरे. असे रडतराउत हातात मिठाची आणि दह्यची वाटी घेऊनच उभे असतात. दिसला जनतेमध्ये आनंद की घाल विरजण किंवा टाक मिठाचा खडा असं करत बसतात. तर त्यांचं कशाला मनावर घ्यायचं?     

आपला देशच सणवारांचा, उत्सव-व्रतवैकल्यप्रचूर देश आहे बघा! त्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध रंगढंग संस्कृती घेऊन आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्राला तर कुठला सण वर्ज्य असा नाही. एवढंच नाही तर रोजच्या एरवीच्या कंटाळवाण्या आयुष्यात थोडी खमंग शेव पेरली जावी, एखादी कुरकुरीत चकली अवचित दाताखाली यावी यासाठीही आपले वार्ताहर मित्र प्रयत्नशील असतात. तुम्हाला आठवत असेलच की मागील वर्षी सुशांतसिंग प्रकरण कित्ती हँडी आलं ते! विविध किस्से, रचलेल्या कहाण्या, गॉसिप्स चवीढवीने सांगण्याऐकण्यात लोक आपली दु:ख जणू विसरूनच गेले. जादूच झाली!  पेट्रोल जणू ३० रुपये लिटर झालं. इतकी जादू! आत्ताही आर्यन खान धावून आलाय बघा आपल्या मदतीला. आता मघाचचा किंवा कुणी दुसरा नतद्रष्ट म्हणेल की, अदानीपोर्टवर सापडलेले अमली पदार्थ हे काही शे टन, काही हजार कोटींचे होते वगैरे वगैरे. पण तुम्हीच मला सांगा, त्यात हे बॉलिवूडी थ्रिल आहे का? तो गुन्हेगार असला तर त्याला शिक्षा मिळोच, पण सध्याच्या घडीला इतका कुणी आखूडशिंगी, बहुमांसी, कोवळा बकरा आहे का? साजरा करावा असा काही फॅक्टर आहे का? नाही ना? झालं तर मग! शिवाय सध्या वानखेडे हिंदू की मुस्लीम की दलित की अजून कुणी, हा प्रश्नही चवीचवीने सेलिब्रेट होतोय. आपल्या घरापर्यंत आग येत नाही तोवर गुलाबी थंडीत तळहात शेकून घेऊ!     

आता दिवाळी आहे तर ‘नो टिकली नो बिझनेस’ असा एक ट्रेंड व्हायरल होतोय. चांगलंच आहे. महागामोलाचे, धुराचे प्रदूषण करणारे फटाके फोडण्यापेक्षा टिकली फोडून दिवाळी साजरी करावी असा उदात्त हेतू यात आहे. ही टिकली म्हणजे कपाळावरची टिकली नसणारच. भाळी काही न लावणाऱ्या आणि मंगळसूत्र आणि कुंकू हिरावल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या विधवा स्त्रियांच्या पोटावरच आपण पाय आणत आहोत ही बाब या ट्रेंड बहाद्दरांनी विचारात घेतली असणारच ना? शिवाय भारताबाहेरदेखील आपले बंधू-भगिनी राहतात त्यांच्याही हिताचा विचार केला असणारच!

तर माझ्या उत्सवप्रिय मित्र मैत्रिणींनो, हॅपी दीपावली! चला, साजरी करू या किल्मिषविरहित दिवाळी! दिव्यांच्या ज्योतीने मनामनातील जळमटांचा धूर आणि जाळ संगटच होऊ दे! मित्रमैत्रिणी : आमेन! (गरजूंनी तथास्तू वाचावं).