लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा उत्साह वाढल्याचे दिसून येत असून निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार राज्यात एकूण २५२ हून अधिक उमेदवारांनी ३८७ अर्ज दाखल केले होते. तर पहिल्या टप्प्यात १० एप्रिलला मतदान होत असलेल्या १० मतदारसंघातून २०८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ८१६ उमेदवार िरगणात होते. त्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्येच २०० चा टप्पा ओलांडला गेला असून सर्व मतदारसंघातील अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर उमेदवारांची संख्या एक हजाराच्या वर जाण्याची चिन्हे आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांचा समावेश असून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव मोघे, प्रकाश आंबेडकर आदी नेते निवडणूक लढवीत आहेत.