जम्मू व काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील १६०० पैकी ८३ टक्के मतदान केंद्रे अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. या मतदारसंघातील १६१५ मतदान केंद्रांपैकी ६९० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्याने दिली.  एकूण मतदान केंद्रांपैकी फक्त १३ टक्के म्हणजे २१० मतदान केंद्रांच्या ठिकाणची परिस्थिती सामान्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.