आम आदमी पक्षाचे नेते योगेन्द्र यादव यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेन्द्र मोदी यांचे भाजपला विजयाकडे नेल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी मोदींचे अभिनंदन करतो, लोकानी त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. वाराणशीत आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि अमेठीत कुमार विश्वास यांचा पराजय निराशाजनक असल्याचे देखील ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, ही आमची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे आम्ही नेस्तनाबूत झाल्याचे आम्ही मानत नाही. संपूर्ण देशात आम्हाला एक कोटीपेक्षा जास्त मते मिळाली असून, अम्ही आमचे अस्तित्व दाखवले असल्याचे मला वाटते.