04 August 2020

News Flash

भाजप व्यक्तिकेंद्रित विचारामध्ये गुरफटला – शुक्ला

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांचे भाजपमधील पर्व अस्तंगत झाले असून आता पक्ष व्यक्तिकेंद्रित विचारांच्या विळख्यात सापडला आहे,

| April 27, 2014 01:52 am

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांचे भाजपमधील पर्व अस्तंगत झाले असून आता पक्ष व्यक्तिकेंद्रित विचारांच्या विळख्यात सापडला आहे, असे मत काँग्रेसच्या नेत्या आणि वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. वाजपेयी आणि अडवाणी पर्वाचा अस्त झाला असून पक्ष व्यक्तिकेंद्री झाला आहे आणि पक्षाला लबाड कोल्ह्य़ांनी घेरले आहे. यापूर्वी पक्षाचे सरकार होते आता मोदी सरकार झाले आहे, मोदी यांनी पतीधर्म पाळला नाही तर ते राष्ट्रधर्म कसा पाळणार, असा सवालही शुक्ला यांनी केला.भाजपमधील नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला असल्याने आपण ३२ वर्षांनंतर पक्ष सोडला. छत्तीसगडमधील विलासपूरमधून आपल्याला उमेदवारी देऊन काँग्रेसने वाजपेयी यांचा सन्मान केला आहे असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:52 am

Web Title: atal advani era ended says vajpayees niece karuna shukla
Next Stories
1 दाऊदच्या प्रश्नावरून गृहमंत्र्यांवर मोदींची टीका
2 गुजरात प्रारुपापासून देवानेच वाचवावे
3 वाराणसीत प्रचारासाठी जाणार नाही – प्रियंका
Just Now!
X