आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मोदींनी प्रचारात पाच हजार कोटी रुपये खर्च केल्याचे आपल्याला सांगण्यात आले, असे केजरीवाल म्हणाले. हा काळा पैसा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अडीच तास चाललेल्या मिरवणुकीत आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी विरोधकांवर टीका केली. राजकीय व्यवस्थेत नागरिकांनी परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ही केवळ माझी लढाई नाही तर जे भ्रष्टाचार नष्ट करू पाहात आहेत, वाराणसीचे द्रारिद्रय़ निर्मूलन करू पाहात आहेत त्या साऱ्यांची ही लढाई आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले
केजरीवाल यांची संपत्ती
*एकूण संपत्ती : २ कोटी १४ लाख
*दोन सदनिका, स्वत:कडे रुपये ४,२५,०८५ व पत्नीकडे १७,४१,५८३
जंगम मालमत्ता    
*३०० ग्रॅम सोने
*२५ हजारांची रोख रक्कम
बदनामीच्या खटल्यात  केजरीवाल आणि इतर दोन नेत्यांना ४ जूनपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. अ‍ॅडव्होट सुरिंदरकुमार शर्मा यांनी  केजरीवाल यांच्यासह मनीष शिसोदिया आणि योगेंद्र यादव यांच्या विरोधात बदनामी केल्याची तक्रार केली होती.