निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्याविरूध्द कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्याविरुध्दचे आरोप मागे न घेतल्यास १०० कोटी रुपये भरपाईचा दिवाणी दावा दाखल करण्याचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील काही शासकीय भूखंडांच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रकल्प आदींबाबत सोमय्या यांनी भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांविरोधात नुकतेच काही आरोप केले होते. शासनाच्या पायाभूत समितीने या प्रकल्पांचा सखोल अभ्यास करून मान्यता दिली होती. दोन दिवसांत माफी न मागितल्यास दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नोटिसांना घाबरत नाही-सोमय्या
आपण अशा नोटिसांना घाबरत नाही. उलट आमचा भ्रष्टाचारविरोधातील लढा आणखी तीव्र होईल, असे सोमय्या यांनी सांगितले. भुजबळच निवडणुकीला भलतेच घाबरलेले दिसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.