30 September 2020

News Flash

‘बीजेडी’चा रालोआला बाहेरून पाठिंबा?

केंद्रात एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत बुधवारी ओदिशातील सत्तारूढ बीजेडी पक्षाने दिले आहेत.

| May 15, 2014 12:45 pm

केंद्रात एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत बुधवारी ओदिशातील सत्तारूढ बीजेडी पक्षाने दिले आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या बाबत कोणतेही आश्वासन दिले नसले तरी पक्ष एनडीएला सशर्त पाठिंबा देईल, असे संकेत पक्षाच्या अन्य नेत्यांनी दिले आहेत.  निकाल येईपर्यंत थांबा, असे पटनाईक यांनी वार्ताहरांना सांगितले.
दरम्यान, अभाअद्रमुक केंद्रात एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी जयललिता यांनी मात्र पक्षाची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे त्या म्हणाल्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2014 12:45 pm

Web Title: bjd leader jay panda hints at providing conditional support to nda patnaik non commital
Next Stories
1 मुंडे यांचा ‘नाराजी’नामा!
2 राष्ट्रवादी काँग्रेससोबतच
3 पंतप्रधानांच्या सन्मान भोजनास राहुल यांची दांडी
Just Now!
X