लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी शिवसेनेकडे करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जागावाटपाचे जूने सूत्र मान्य करू नये, या मतावर प्रदेश भाजपचे एकमत झाले आहे. नमो’ लाटेचा लाभ शिवसेनेला झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला जागा वाढवूनच मिळाल्या पाहिजे, असा सूर राज्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीत उमटला. खासदारांवर कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची विनंती भाजप नेत्यांनी केली
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस भाजपचे मराठी खासदार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय शिवसेनेसह महायुतीतील सहकारी पक्षांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे या बैठकीत अनुपस्थित होते. आजच्या बैठकीत विधानसभेसाठी प्रचाराची दिशा ठरवण्यात आली. निवडणूक काळात वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रशिक्षण, होणार असून येत्या १५ दिवसात बूथ प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी शिवसेनेकडे करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जागावाटपाचे जूने सूत्र मान्य करू नये, या मतावर प्रदेश भाजपचे एकमत झाले आहे. नमो’ लाटेचा लाभ शिवसेनेला झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला जागा वाढवूनच मिळाल्या पाहिजे, असा सूर राज्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीत उमटला. खासदारांवर कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची विनंती भाजप नेत्यांनी केली.
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस भाजपचे मराठी खासदार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय शिवसेनेसह महायुतीतील सहकारी पक्षांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे या बैठकीत अनुपस्थित होते. आजच्या बैठकीत विधानसभेसाठी प्रचाराची दिशा ठरवण्यात आली. निवडणूक काळात वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रशिक्षण, होणार असून येत्या १५ दिवसात बूथ प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत.
भाजपची आज राष्ट्रीय परिषद
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडीवर उद्या, शनिवारी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या बैठकीसाठी देशभरातून भाजप पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्राची कोअर समिती व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत राष्ट्रीय परिषदेनंतर बैठक होणार आहे. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद सोपविले जाण्याची शक्यता आहे.