स्वतःच्या घरच्या मैदानावर नरेंद्र मोदी आणि भाजपने बिनबाद सर्वच्या सर्व जागा पटकावत विरोधकांना जोरदार उत्तर दिले आहे. गुजरातमधील २६ पैकी ११ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, १५ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदी वडोदरा मतदारसंघातून तब्बल पाच लाख मतांनी आघाडीवर आहेत.
राजस्थानमध्येही भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून, इथेही कॉंग्रेसच्या उमेदवारांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील २५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ पैकी सर्वच्या सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसला या राज्यात आपले खातेही उघडता आलेले नाही.
छत्तीसगढमधील ११ जागांपैकी ९ जागांवर भाजपचे तर २ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी २५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असून, १ जागेवर पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. तीन जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.