ईशान्येकडील सात राज्यांपकी एक असणाऱ्या आसामचा विकास प्राधान्याने केंद्रावरच अवलंबून आहे. नक्षलवाद, नसíगक आपत्ती, बांगलादेशकडून होणारी घुसखोरी, प्रादेशिकवाद आदी प्रश्नांमुळे नेहमीच अस्वस्थ असणाऱ्या या राज्याला विकासाच्या दृष्टीने विशेष रोजगार आणि आíथक क्षेत्र म्हणून राज्याला दर्जा देण्याची नवी मागणी पुढे आली आहे. या पाश्र्वभूमीवर आसामचा विकास आम्हीच करणार असा दावा करणारी काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी बाजूला सारून भाजपच्या लाटेत तसेच प्रादेशिक पक्षाच्या ताकदीपुढे तग धरून येथील सत्ता कायम ठेवणार की, मोदी करिष्मा भाजपला मदत करणार हे लवकरच स्पष्ट होईल.
लोकसभेसाठी आसाममध्ये  ७, १२ आणि २४ एप्रिल रोजी अशी तीन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. या राज्यातून १४ खासदार केंद्रात जातात. आसाममध्ये सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या चार वर्षांच्या कालावधीत काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुस चव्हाटय़ावर आली आहे. पक्षाच्याच ३१ लोकप्रतिनिधींनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करीत नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी नाराजांनाच दम भरत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर स्वकीयांची नाराजी काँग्रेसला त्रासदायक ठरेल असे बोलले जाते.   
भाजपची भूमिका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देश ढवळून काढायला सुरुवात केली आहे. आसाम दौरा करून बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच बांगलादेशातून आलेल्या िहदू निर्वासितांना भारतात कायमस्वरूपी सामावून घेण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी  जाहीर केले. त्याचप्रमाणे जमीन हस्तांतरणाबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने इतर पक्षांना विश्वासात न घेता बांगलादेशबरोबर केलेल्या करारालाही भाजपने आक्षेप घेतला आहे.  
या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांसह एआययूडीएफ, आसाम गण परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रन्ट या महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांनीही जोरदार मोच्रेबांधणी केली आहे. आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट(एआययूडीफ)चे मौलाना बद्रुद्दीन अजमल हे पक्षाचे एकमेव खासदार पुन्हा आसामच्या धुब्री मतदारसंघातून उतरले आहेत. तर विधानसभेतील पक्षाचे नेते आणि त्यांचा भाऊ सिराजुद्दीन अजमल हे बारपेटा मतदारसंघातून उभे आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना राज्यातून हुसकावून लागवण्याचा निर्धार एआययूडीएफने केला आहे.  
आसाम विधानसभेत काँग्रेस टक्कर देणारा आणखी एक पक्ष म्हणजे आसाम गण परिषद. एकेकाळी आसामच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या या पक्षाला नंतर उतरती कळा लागली. या पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार महंत यांना मुख्यमंत्रिपद मिळवून देणाऱ्या या पक्षाला नंतरच्या काळात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. निवडणुकीच्या धामधुमीत एकमेव खासदार असणाऱ्या जोसेफ टोपो यांनी राजिनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला होता. मात्र त्यांनी नंतर राजिनामा मागे घेतला. याशिवाय माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रमोहन पोट्टावारी, माजी मंत्री हितेंद्र नाथ गोस्वामी आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आसाम गण परिषदेला धक्का बसला आहे. बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटदेखील मैदानात असून कोक्राझारच्या जागेसाठी काँग्रेसची मदत मिळेल. या मतदारसंघातून बीपीएफ विद्यमान खासदार एस. के. विश्वमुथिअरी यांच्याऐवजी चंदन ब्रह्मा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या विश्वमुथिअरी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
प्रमुख लढती
*कालियाबोर – गौरव गोगोई (काँग्रेस), डॉ. अरुण सरमाह (एजीपी), मृणाल कुमार सकिया (भाजप)
*धीब्रुगड – पबन सिंग घाटोवार (काँग्रेस), रामेश्वर तेली (भाजप)
*लखीमपूर – सरबनंद सोनोवल (भाजप), रानी नाराह (काँग्रेस)

२००९ बलाबल
एकूण जागा १४
०७ काँग्रेस</span>
०४ भाजप
०३ इतर
प्रमुख मुद्दे
बांगलादेशातून होणारी घुसखोरी, राज्याला भेडसावणारी पूरपरिस्थिती, रोजगार आणि आíथक विशेष क्षेत्र म्हणून घोषित करणे, स्थानिक सहा वांशिक गटांना अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करणे, भू तसेच नसíगक स्रोतांविषयीचे धोरण आदी मुद्दे.