भारतीय जनता पक्ष (भाजप) भांडवलदारांच्या कंपूशाहीचे प्रतिनिधित्व करत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केली. तसेच ‘यूपीए’ सरकार देशाच्या व्यावसायिक विकासासाठी योग्य असल्याचेही ते म्हणाले.
पी.चिदंबरम म्हणतात की, यूपीए सरकारने देशाच्या विकासाची वाटचाल योग्य राहण्यासाठी नेहमी योग्य ते निर्णय घेतले आहेत. तसेच सध्याची देशाची आर्थिक परिस्थिती आधीच्या २० महिन्यांपेक्षा बळकट आहे. ‘एनडीए’ सरकारच्या कार्यकाळातील बेरोजगारीच्या टक्केवारीपेक्षा  ‘यूपीए’ सरकारच्या काळातील बेरोजगारीची टक्केवारी कमी राहिली आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या बाबतीत भाजपने टीका करूच नये.” मोदींमार्फत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून खोटे चित्र मांडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच मोदींच्या हाती नेतृत्व गेल्यास देशाचे वाटोळे होईल असेही म्हटले आहे.
२००९-१० काळात ४५.९ कोटी युवकांना रोजगार मिळाला त्यानंतर २०११-१२ या काळात हा आकडा ४७.२ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत यूपीए सरकार कटीबद्ध राहिल्याचे दिसून येते. असेही चिदंबरम म्हणाले. लोकसभा निवडणूक न लढविण्याबाबत विचारले असता चिदंबरम म्हणाले की, “मी राजकारणातू निवृत्ती घेतलेली नाही, यापुढेही योग्य ते सहकार्य करत राहीन, केवळ लोकसभा न लढविण्याचा निर्णय मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव घेतला.”