शुक्रवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनंतर  काही राज्यांमध्ये भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या असून विरोधकांना तेथे खातेही उघडता आलेले नाही.
गुजरात (२६), राजस्थान (२५), उत्तराखंड (५), दिल्ली (७), हिमाचल प्रदेश (४) या राज्यांमध्ये भाजपला पूर्णपणे आघाडी मिळाली असून विरोधी काँग्रेस अथवा अन्य पक्षांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अन्य राज्यांची पक्षनिहाय स्थिती अशी –
हरयाणा- एकूण जागा १० जाहीर निकाल १०
भाजप (७), राष्ट्रीय लोकदल (२), काँग्रेस (१).
बिहार- एकूण जागा ४०, जाहीर निकाल २९.
भाजप (१७), लोजप (४), राजद (३), राष्ट्रीय लोकसमिती (३), काँग्रेस (२).
आसाम- एकूण जागा १४ जाहीर निकाल १४
भाजप (७), ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रण्ट (३), काँग्रेस (३), अपक्ष (१).
पंजाब- एकूण जागा १३, जाहीर निकाल १३
अकाली दल (४), आम आदमी (४), काँग्रेस (३), भाजप (२).