08 August 2020

News Flash

वरुणने भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करावा – मनेका गांधी

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विकासकामांची प्रशंसा केल्याने मनेका गांधी प्रचंड नाराज झाल्या आहेत.

| April 4, 2014 03:21 am

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विकासकामांची प्रशंसा केल्याने मनेका गांधी प्रचंड नाराज झाल्या आहेत. अमेठीच्या विकासकामांबाबत वरुणने केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असून, त्याने एखादे विधान करताना भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करावा, असे मनेका म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगली विकासकामे केली आहेत, असे विधान वरुण गांधी यांनी केले होते. मात्र गेल्या ४५ वर्षांत अमेठीमध्ये कोणतेही विकासकाम झालेले नाही, असे मत मनेका यांनी व्यक्त केले. वरुणने योग्य माहिती घेऊन विधान केलेले नाही. तो निरागस असून, त्याचे मन स्वच्छ आहे. त्यामुळे तेथील काही चांगल्या कामांची त्याने प्रशंसा केली. मात्र त्याने बोलताना भावनिक न होता बुद्धीचा वापर करावा, असा सल्ला मनेका यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2014 3:21 am

Web Title: dont think with your heart advice for varun gandhi from mother maneka
Next Stories
1 दुंदुभी नगारे
2 मिझोरमच्या एका जागेचे तीन दावेदार
3 मेघालयात संगमांची कसोटी
Just Now!
X