भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास २२ हजार लोकांना प्राणाला मुकावे लागेल, असे वादग्रस्त विधान करणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. वादग्रस्त विधान केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि खुलासा करण्यास सांगितले होते. खुलासा करण्याची मुदत आज सकाळी संपत असतानाचा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना गुरुवारपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली. हिमाचल प्रदेशमधील सोलानमध्ये एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.