निवडणूक आयोगावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांना बुधवारी नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे.
कारगिलप्रकरणी वादग्रस्त विधान केल्यानंतर निवडणूक आयोगाने आझम खान यांना राज्यात निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली. या बंदीनंतर आझम खान यांच्यावर नव्याने नोटीस बजावली आहे. आझम खान यांना येत्या शुक्रवापर्यंत नोटिसीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र वेळेत उत्तर न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर आझम खान यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. आझम खान सातत्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग करीत आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.