07 August 2020

News Flash

‘परवानगी नाकारल्याचे वेळेत न कळविणे दुर्दैवी’

नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथे सभा घेण्यास परवानगी नाकारल्यामुळे भाजपच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी बाँबगोळा टाकला.

| May 10, 2014 12:50 pm

नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथे सभा घेण्यास परवानगी नाकारल्यामुळे भाजपच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी बाँबगोळा टाकला. भाजपशासित गुजरात राज्यातील पोलिसांकडूनच सभास्थानाविषयी ‘नकारात्मक अभिप्राय’ आल्यामुळे ही परवानगी नाकारल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी, ‘संबंधित पक्षाला ही परवानगी नाकारल्याचे कळविण्यास अंमळ उशीरच झाला आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत’, असेही निवडणूक आयोगाने पुढे नमूद केले.
मोदी यांच्या प्रचारसभेचे ठिकाण अत्यंत गजबजलेले आणि प्रवासाच्या दृष्टीने गुंतागुंतीचे होते, असे सांगत मोदी यांच्या पथकातील पोलिसांनी सभास्थान योग्य नसल्याचा शेरा मारला होता, अशी माहिती निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी दिली. गुरुवारी नरेंद्र मोदी बेनिया बाग परिसरात एक प्रचारसभा घेणार होते. मात्र ती घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने भाजपने निवडणूक आयोगावरच शरसंधान केले होते.
आयोगावर टीका करणाऱ्या भाजप आणि नरेंद्र मोदींवरच भाकपने जोरदार हल्ला चढविला आहे. ही कृती चुकीचे असल्याचे भाकपने स्पष्ट केले.

एखाद्या सभेस परवानगी देणे अथवा योग्य कारणास्तव ती नाकारणे हा आयोगाचा तसेच जिल्हा प्रशासनाचा अधिकार आहे. मात्र परवानगी नाकारल्यानंतर ती वेळेवर कळविणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मोदींच्या वाराणसी येथील प्रचारसभेबाबत तसे न होणे हे अत्यंत दुर्दैवी होते.
– एच.एस. ब्रह्मा, निवडणूक आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2014 12:50 pm

Web Title: election commission justifies denial of permission to narendra modi rally
Next Stories
1 कलगीतुरा: मोदींच्या जातीवरुन अन् उच्च-नीच शब्दांवरून
2 पाठिंब्यासाठी सर्व पर्याय खुले ; अमित शहा यांचे स्पष्टीकरण
3 मुंबई, ठाणे, पुण्यासाठी नव्या मतदार याद्यांची भाजपची मागणी
Just Now!
X