लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात १२ राज्यांत १२१ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. मतदानाच्या नऊ टप्प्यांपैकी या टप्प्यात सर्वाधिक जागा आहेत. आतापर्यंत पहिल्या चार टप्प्यांमध्ये १११ जागांसाठी मतदान झाले आहे. ओडिशा विधानसभेच्या ७७ जागांसाठीही या टप्प्यात मतदान होईल. यामधील सध्या ३६ जागा काँग्रेसकडे तर भाजपकडे ४० जागा आहेत. देशात कर्नाटकमध्ये सर्व २८, राजस्थान (२०), महाराष्ट्र (१९), उत्तर प्रदेश, ओदिशा (प्रत्येकी ११), मध्य प्रदेश (१०), बिहार (७), झारखंड (६), पश्चिम बंगाल (४), छत्तीसगढ (३), जम्मू आणि काश्मीर, मणिपूर (प्रत्येकी १) जागांवर मतदान होईल.

पाचव्या टप्प्याची वैशिष्टय़े
* मतदार : १६ कोटी ६१ लाख
* उमेदवार : १ हजार ७६९
* ‘स्टार’ उमेदवार : अशोक चव्हाण, सुशीलकुमार िशदे, नंदन निलेकणी, गोपीनाथ मुंडे, मनेका गांधी, वीरप्पा मोईली, सुप्रिया सुळे  एच.डी.देवेगौडा, श्रीकांत जेना, मिसा भारती