हिंदू मुन्नानीचे नेते जीवराज यांची पहाटेच्या सुमारास घराजवळ तीन अज्ञातांनी हत्या केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.घरासमोर काही जणांशी चर्चा करीत असताना ही घटना घडली. हल्ल्यानंतर मिरचीपूड फेकून ते पसार झाले. काठय़ांनी त्यांनी जीवराज यांच्या डोक्यावर वार केल्याने ते जागीच ठार झाले. हिंदू मुन्नानीच्या पदाधिकाऱ्याची गेल्या महिन्यातली ही दुसरी हत्या आहे.