पंतप्रधापदाच्या महत्वाकांक्षेला पहिल्यांदाच उघडपणे दुजोरा देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संसदीय कामकाज आणि राज्यसरकार चालविण्याच्या अनुभवावरून पंतप्रधानपदासाठी  जाहीर झालेल्या उमेदवारांपेक्षा माझी पात्रता अधिक असल्याचे म्हटले.  
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता नितीश कुमार म्हणाले की, एकाला राज्यसरकार चालविण्याचा तर, दुसऱयाला संसदीय कामकाजाचा अजिबात अनुभव नाही. मी, तर दोन्ही बाबतीत अनुभवी आहे तरीसुद्धा मी पंतप्रधानपदासाठी पात्र नाही का? असा सवाल नितीश कुमार यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत नितीश कुमारांना विचारले असता, आमचा पक्ष, तर लहान आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या अपेक्षा आमच्या नाहीत परंतु, आजपर्यंत आमच्या पक्षाने प्रामाणिकपणे काम केले आहे आणि यापुढेही करत राहू असेही कुमार म्हणाले.