मतदान हा पवित्र अधिकार. मूल्यवान. आपल्या आयुष्यावर दृश्य-अदृश्य परिणाम करणारा. पण सगळेच तो बजावतात असे नाही. पण काही नागरिक असेही असतात की काहीही होवो, आपण कोणत्याही अडचणीत, संकटात असो, मतदानाच्या दिवशी रांगेत उभे राहून आपले कर्तव्य बजावतातच. आपणही कधी अशा प्रकारे आपत्ती, दुर्घटना, वैयक्तिक अडचणी, दु:खद प्रसंग यावर मात करीत मतदानाच्या रांगेत उभे राहिला असालच. आपले हे प्रेरणादायी अनुभव आम्हाला थोडक्यात कळवा. आम्ही त्यातील काही निवडक अनुभवांना प्रसिद्धी देऊ. शब्दमर्यादा- २०० शब्द.
आपला मजकूर पुढीलपैकी सोयीच्या पत्त्यावर पाठवावा.
ल्ललोकसत्ता संपादकीय विभाग-  प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०. फॅक्स : ०२२-२७६३३००८.
ल्ललोकसत्ता संपादकीय विभाग- एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५. फॅक्स- ०२०६७२४११४७.
ल्ललोकसत्ता संपादकीय विभाग- १९- ग्रेट नाग रोड, नागपूर- ४४०००९.
फॅक्स क्रमांक २७५०४२१