शुक्रवारी मुख्य वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या वृत्ताप्रमाणे देशात लैंगिक शिक्षणावरील बंदीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ़  हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आह़े  मी वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि बुद्धिवादाचा पुरस्कर्ता आह़े  त्यामुळे सांस्कृतिकदृष्टय़ा स्वीकारार्ह असणाऱ्या शास्त्रीय अध्यापनशास्त्राला माझा मन:पूर्वक पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितल़े
जे सारासार विवेकाला पटत नाही त्याचा जबाबदार व्यक्ती त्याग करत़े  आणि त्याऐवजी स्वीकारार्ह शिक्षण प्रक्रियेचा स्वीकार करते, असेही हर्ष वर्धन म्हणाल़े  शाळांतील लैंगिक शिक्षण बंद करण्यात यावे, असे हर्ष वर्धन यांनी संकेतस्थळावरून म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होत़े  त्यावर त्यांनी हा खुलासा केला़  २००७ साली यूपीए शासनाने किशोर शिक्षण कार्यक्रम मूळ स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेतला होता़  त्यासंदर्भात मी संकेतस्थळावर मतप्रदर्शन केले होते आणि ते माझे पूर्णत: वैयक्तिक मत होते, असेही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आह़े