08 July 2020

News Flash

लोकसभेतील मुस्लीम खासदारांची संख्या घटली

नुकत्याच पार पडलेल्या १६व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लीम खासदारांची संख्या २५ वरून घटून २० वर आली आहे. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम भारतात भाजप आणि त्याच्या

| May 18, 2014 02:16 am

नुकत्याच पार पडलेल्या १६व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लीम खासदारांची संख्या २५ वरून घटून २० वर आली आहे. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम भारतात भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारल्याने मुस्लीम खासदारांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून या वेळी एकही मुस्लीम उमेदवार संसदेवर निवडून गेला नाही. ५४३ जागांपैकी देशातून २० मुस्लीम खासदार निवडून आले आहेत. भाजपकडून मुस्लीम समाजातील एकही उमेदवार जिंकून आला नाही. २० पैकी ७ मुस्लीम उमेदवार हे एकटय़ा पश्चिम बंगालमधून निवडून आले आहेत. या खालोखाल बिहारमधून ४ मुस्लीम खासदार आहेत. मावळत्या लोकसभेत २५हून अधिक मुस्लीम खासदार होते. तृणमूल काँग्रेसचे किमान ३ ते ४ खासदार हे मुस्लीम आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2014 2:16 am

Web Title: just 20 muslim mps in 16th lok sabha
टॅग Lok Sabha Election
Next Stories
1 माझी कारकीर्द हे ‘खुले पुस्तक’- डॉ. सिंग
2 ‘मोदीविजया’ची जगभरात दखल
3 आंध्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा
Just Now!
X