ज्येष्ठ काँग्रेस नेते करणसिंह यांचा थोरला मुलगा विक्रमादित्यसिंह शुक्रवारी पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षात प्रवेश करणार आहे. जम्मू येथील समारंभात ते हा पक्ष प्रवेश करतील. विक्रमादित्य महाराजा हरीसिंहांचे नातू आहेत. करणसिंह यांचा धाकटा मुलगा अजातशत्रू सिंह नॅशनल कॉन्फरन्समध्ये आहेत. ५० वर्षांचे विक्रमादित्य सिंह सध्या हिमाचलमधील हॉटेल व्यवसाय सांभाळतात.