News Flash

‘कडोंमपा’ आयुक्तांची तडकाफडकी बदली

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त शंकर भिसे यांची रविवारी तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

| April 14, 2014 01:08 am

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त शंकर भिसे यांची रविवारी तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आचारसंहितेच्या काळात स्थायी समितीची बैठक घेऊन त्यात दहा कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर केली होती. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने भिसे काहीसे अडचणीत आले होते. त्यामुळे स्थायी समितीची वादग्रस्त बैठकच भिसे यांच्या तडकाफडकी बदलीस कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:08 am

Web Title: kdmc ceo transfers
Next Stories
1 बारू यांचे आरोप निराधार
2 लेखक-कलाकार मोदींविरोधात एकवटले
3 राहुल गांधींकडून आंबेडकरांचा अपमान – मोदी
Just Now!
X