News Flash

जीव देईन, पण भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाणार नाही- अरविंद केजरीवाल

मी एकवेळ जीव देईन, पण भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

| April 2, 2014 06:38 am

Arvind Kejriwal, केजरीवाल
सीबीआयला विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचे काम मोदी सरकारने दिले आहे.

मी एकवेळ जीव देईन, पण भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
गॅसच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याचे ठोस आश्वासन नरेंद्र मोदी देत असतील, तर मी भाजपसोबत जाईन असे वक्तव्य केजरीवाल यांनी पूर्व दिल्लीतील गांधीनगर येथील प्रचारात केले होते. मात्र, याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये येताच केजरीवालांनी आपल्या विधानावर पलटी मारली.
केजरीवाल म्हणाले, “भाजपमध्ये जाण्यास तयार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. प्रसारमाध्यमांमधील त्यासंबंधीचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. एकवेळ जीव देईन, पण भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 6:38 am

Web Title: kejriwal says i will die but will never join congress or bjp
Next Stories
1 काँग्रेसचे ‘वीर’ पराभवाच्या छायेत
2 अमित देशमुखांच्या ‘समझोता एक्स्प्रेस’ची कसोटी!
3 आदिवासीसुद्धा उत्साहाने मतदान करतात!
Just Now!
X