13 July 2020

News Flash

दुंदुभी नगारे

बॉलीवूडमधील प्रख्यात पाश्र्वगायक आणि भारतीय जनता पक्षाचे आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाबुल सुप्रियो अखेर शुक्रवारी पोलिसांना शरण आले.

| April 19, 2014 03:16 am

बाबुल सुप्रियो पोलिसांना शरण
बर्धमान : बॉलीवूडमधील प्रख्यात पाश्र्वगायक आणि भारतीय जनता पक्षाचे आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाबुल सुप्रियो अखेर शुक्रवारी पोलिसांना शरण आले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुप्रियो यांच्याविरोधात तक्रा दाखल केली होती. त्याप्रकरणी पोलिसांसमोर शरण येण्यासाठी सुप्रियो यांनी २४ तासांची मुदतही मागितली होती.
१२ मार्च रोजी प्रचार करीत असताना तृणमूल काँग्रेसच्या काही ‘दंगेखोरांनी’ आपल्या रोड शोदरम्यान हुल्लडबाजी केली. या समर्थकांनी आपला अवमान केला आणि आपल्यावर दगडफेकही केली असा आरोप सुप्रियो यांनी केला.
तेलंगणात भाजपच्या जाहीरनाम्यात विनामूल्य लॅपटॉप
हैदराबाद : गुणवंत विद्यार्थ्यांना विनामूल्य लॅपटॉप, विद्यार्थिनीला एक लाख रुपये रोख पुरस्कार आणि कृषिक्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प अशी आश्वासने  भाजपने तेलंगणसाठी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. ‘प्रतिभा कमल’ कार्यक्रमाअंतर्गत, अभियांत्रिकीच्या सामायिक प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना, वैद्यकीय आणि एमबीएच्या सामायिक प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी ५०० विद्यार्थ्यांना विनामूल्य लॅपटॉप दिले जातील, असे आश्वासन भाजपने दिले आहे. अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या दोन हजार विद्यार्थिनी आणि एमबीए-सीईटी परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या १०० विद्यार्थिनींना प्रत्येकी एक लाख रुपये रोख पुरस्कार दिला जाईल.
अधिकाऱ्याच्या घराजवळ मतदान यंत्र
केंद्रपारा : ओदिशातील केंद्रपारा या मतदारसंघातील वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याच्या घराजवळ काही मतदान यंत्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली. या अधिकाऱ्याने मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत प्रक्षुब्ध जमावाने सदर अधिकाऱ्यास धक्काबुक्कीही केली. अनेक मतदान यंत्रे असलेले वाहन सदर सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानाजवळ आढळल्याची तक्रार शुक्रवारी सकाळी दाखल करण्यात आली आहे.
तरी राज्यात नेतृत्वबदल नाही
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसला २० हून अधिक जागा मिळतील, असा दावा पक्षाने केला आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत, तरी राज्याच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, कारण हे सिद्धरामय्या सरकारच्या कामगिरीबाबतचे जनमत नाही, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्यावर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते या नात्याने सिद्धरामय्या यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी असली तरी ही निवडणूक म्हणजे राज्यातील सरकारच्या कामगिरीचा आढावा नव्हे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर यांनी सांगितले.
द्रमुकच्या अडचणींमध्ये भर
चेन्नई :  द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने  सुरू झालेली सुंदोपसुंदी अद्यापही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अळगिरी यांनी २४ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाविरुद्ध उघड बंड पुकारले असून त्याचा लाभ अन्य राजकीय पक्षही उठवू लागल्याने द्रमुकसमोरील अडचणींमध्ये भर पडली आहे. द्रमुकने ज्या उमेदवारांना तिकीट दिले आहे ते अळगिरी यांचे धाकटे बंधू एम. के. स्टालिन यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत द्रमुक चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल, अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना अळगिरी यांनी आपल्या समर्थकांना दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2014 3:16 am

Web Title: lok sabha election lok sabha election 2014 lok sabha
Next Stories
1 BLOG : पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांत नरेंद्र मोदी
2 कलम ३७० रद्द केल्यास काश्मीर भारताबाहेर!
3 लक्षवेधीलढती : लढाई विक्रमी मताधिक्यासाठी
Just Now!
X