लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी पाटोपाठ भारतीय जनता पार्टीनेही राज्यातील १७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादील सोडचिट्ठी देऊन कालच भाजपात आलेले संजय काका पाटील यांना सांगलीतून तर विद्यमान आमदार गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धुळ्याचे विद्यमान खासदार प्रताप सोनावणे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. किरीट सोमय्या ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.उमेदवारीसाठी पूनम महाजन आणि सोमय्या यांच्यात चुरस होती.
भाजपचे उमेदवार
दिलीप गांधी (अहमदनगर), गोपीनाथ मुंडे (बीड), किरीट सोमय्या (ईशान्य मुंबई), गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), चिंतामण वनगा (पालघर), हरिश्चंद्र चव्हाण (िदडोरी), रावसाहेब दानवे (जालना), डी. बी. पाटील (नांदेड), संजय पाटील (सांगली), नितीन गडकरी (नागपूर), नाना पाटोले (भंडारा-गोिदया), डॉ. सुभाष भामरे (धुळे), संजय धोत्रे (अकोला), हंसराज अहिर (चंद्रपूर), अशोक नेते (गडचिरोली), ए. टी. नाना पाटील (जळगाव), हरिभाऊ जावळे (रावेर)