तृणमुल काँग्रसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना अण्णा हजारेंनी दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. ममतांच्या जवळच्या लोकांनी आपल्याला फसवले. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणे अवघड असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.
तृणमुल काँग्रेसच्या जाहिरातींमध्ये आपणे नाव वापरणे थांबवावे, असे ममतांना सांगितल्याचे अण्णांनी स्पष्ट केले. अण्णांचा सतरा कलमी कार्यक्रम राबवण्यास ममतांनी संमती दिल्यावर १९ फेब्रुवारीला त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र हा पाठिंबा ममतांना होता त्यांच्या पक्षाला नव्हता, असे अण्णांनी सांगितले. मात्र आता आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ममतांची दिल्लीतील सभेचा फज्जा उडाल्यानंतर त्यांच्यातील विसंवाद पुढे आला आहे.  तृणमूल काँग्रेसच्या सभेला उपस्थित राहण्यावरून दिशाभूल करण्यात आल्याने आपण रामलीला मैदानावरील सभेला अनुपस्थित असल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे. हजारे सभेला उपस्थित न राहिल्याने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची चांगलीच पंचाईत झाली होती.
आपला कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, मात्र देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये ममता बॅनर्जी अग्रस्थानी आहेत. ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सभेला आपल्याला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्याच वेळी अण्णा हजारे यांनी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित राहण्यास बॅनर्जी यांना सांगण्यात आले होते.
आपण दिल्लीत आलो तेव्हा सभेला केवळ दोन ते अडीच हजार जणच उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. आपण ज्या वेळी या मैदानात आंदोलन केले, तेव्हा सदर मैदान अपुरे पडले होते. त्यामुळे आपल्याला धोका देण्यात आल्याची अण्णा हजारे यांची भावना झाली. अण्णा यांनी त्याबाबत एका आयोजकालाही दूषणे दिली.
अण्णा हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सभेला उपस्थित राहिले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यापूर्वी अण्णा हजारे यांच्या सहकाऱ्यांनी दिले होते.