06 July 2020

News Flash

मनोहर जोशींच्या वक्तव्याबाबत गोपीनाथ मुंडे यांचे कानावर हात!

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या संदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजप

| April 21, 2014 04:00 am

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या संदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी येथे कानावर हात ठेवले.
मनोहर जोशी यांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला
जालना मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेनंतर विचारलेल्या प्रश्नावर मुंडे म्हणाले, पवार यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या संदर्भातील तथ्य मनोहर जोशी किंवा रामदास आठवलेच सांगू शकतील. पवारांनी मागील विधानसभेच्या वेळी युतीसाठी माझ्याशी संपर्क साधलेला नव्हता. पुणे लोकसभा मतदारसंघातील मासळवाडी येथे मतदान केले नाही, तर पाणी तोडण्याची अजित पवार यांची भाषा मस्तवालपणाची आहे. सत्तेवरून दूर करून त्यांची ही मस्ती जिरवू, असेही मुंडे म्हणाले.
राजकारण्यांपेक्षा जनता हुशार – पवार
तत्पूर्वी अंबड येथील जाहीर सभेत मुंडे म्हणाले, की सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. भारनियमनमुक्त करण्याची घोषणा झाली.  मराठवाडय़ात गारपीट झालेल्या ज्या भागात मुख्यमंत्री येऊन गेले तेथे तातडीने पंचनामेही झाले नाहीत. दुष्काळाच्या वेळी मराठवाडय़ास गरज असतानाही सरकारने जायकवाडीत वरच्या धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले नाही. गारपीट झाल्यानंतर ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु राज्य शासनाने त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक मदतीचा हात पुढे केला नाही असा आरोपही मुंडे यांनी केला.
..म्हणून मी अपमानही पचविला – मनोहर जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2014 4:00 am

Web Title: manohar joshi comment gopinath munde keeps mum
Next Stories
1 मोदींवर ‘लक्ष्मी प्रसन्न’, महाराष्ट्रात मात्र ‘संक्रांत’
2 मोदींच्या आजच्या सभेत मुंबईकरांना नवे स्वप्नरंजन?
3 गांधी घराण्याच्या नंदुरबारमधील परंपरेत प्रथमच खंड
Just Now!
X