07 July 2020

News Flash

मनसेच्या आंदोलनानंतरच ‘टोल’धाडीला वेसण

दोन, पाच कोटींच्या रस्त्यांसाठी २०-२५ वर्षे टोल वसूल करणाऱ्या राज्य शासनाने मनसेच्या आंदोलनानंतरच वठणीवर येत ६५ टोलनाके बंद केले.

| April 17, 2014 04:16 am

दोन, पाच कोटींच्या रस्त्यांसाठी २०-२५ वर्षे टोल वसूल करणाऱ्या राज्य शासनाने मनसेच्या आंदोलनानंतरच वठणीवर येत ६५ टोलनाके बंद केले. आणखी २२ टोलनाके अजूनही अन्यायकारक पद्धतीने येथील जनतेला लुटत असून आचारसंहिता संपल्यानंतर या आंदोलनाचा पाठपुरावा आपण सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार राजू पाटील यांच्या अंबरनाथ येथील प्रचारसभेत दिली.
मनसेच्या आंदोलनानंतरच रेल्वे भरतीच्या परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दुकानांवरील पाटय़ा मराठी झाल्या. महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीची तसेच प्राथमिक सुविधांची समस्या गंभीर आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई आहे, तरीही परप्रांतीय मोठय़ा प्रमाणात राज्यात येतच आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमधून ४८ ट्रेन्स महाराष्ट्रात येतात. त्या कशासाठी, असा प्रश्न येथील खासदारांना विचारावासा वाटत नाही. गोव्याचे मुख्यमंत्री मात्र बिहारमधील ट्रेनला विरोध करतात. महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत कणाहीन पद्धतीने वागतात, लाचार होतात. त्यामुळे केंद्र शासनाकडून महाराष्ट्राच्या पदरी कायम निराशाच पडत आली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी शासन प्रयत्नच करीत नाही. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी मनसे यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कुणाला जिंकविण्यासाठी किंवा हरविण्यासाठी नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 4:16 am

Web Title: mns agitation closed 65 toll plazas raj thackeray
Next Stories
1 ‘राज’कीय वाऱ्याचा अंदाज घेऊन मुंडेंबाबत शिवसेनेचा वाघ थंड!
2 महाराष्ट्राचा ‘मनसे’ आवाज दिल्लीत घुमणारच- राजू पाटील
3 कार्यकर्ता, उमेदवार, नेता : सबकुछ एक!
Just Now!
X