मतदानाच्या आदल्या रात्री शिवसेना आणि मनसेमध्ये मानखुर्द येथे मारामारी झाली. या वेळी बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस हवालदार अशोक थोरबोले या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नीसह १८ जणांवर हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या तक्रारीवरून मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.जय महाराष्ट्र नगर येथील खंडोबा मंदिराजवळ शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला