08 August 2020

News Flash

मोदींकडून हीन दर्जाचे राजकारण ; सोनिया गांधी यांचा आरोप

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले.

| May 9, 2014 12:27 pm

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी हीन दर्जाचे राजकारण करत असून, हे राजकारण त्यांना आणि राष्ट्रीय राजकारणाला शोभणारे नाही, असे शरसंधान सोनिया यांनी केले.
मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श घ्यावा. वाजपेयींसह अन्य माजी पंतप्रधानांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली. मात्र राजीव गांधी यांच्यावर टीका करून मोदी यांनी आपण या पदाला लायक नसल्याचे दाखवून दिले आहे. राजकारणात क्षुल्लक मुद्दे आणून मोदी हीन पातळीचे राजकारण करत आहेत, असे सोनिया म्हणाल्या. राजीव गांधी ज्या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते, त्या वेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा जाहीर अवमान केला होता, अशी टीका मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेठी येथील सभेत केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2014 12:27 pm

Web Title: modi playing politics of trivialities sonia gandhis allegations
Next Stories
1 विधान परिषदेसाठी काँग्रेसचे ‘एकला चलो’
2 मोदी उच्चवर्णीयच : काँग्रेसचा आरोप
3 तावडे यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनच काम करीत राहावे.!
Just Now!
X