काँग्रेससह बसपा, सप त्यांचे अपयश लपवण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी केली़
निवडणुकीचा काळ जसजसा जवळ येत आहे. तसा लोकांचा कल भाजपच्या दिशेने सरकत आहे. नेस्तनाबूत होण्याच्या भीतीने काँग्रेस, सप, बसपाला ग्रासले आहे. त्यामुळे मते मिळवण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली दिशाभूल केली जात असल्याचे मोदी म्हणाल़े काँग्रेस, सप, बसपाकडून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला जनता भूलणार नाही, असे मोदी म्हणाले.
अखिलेश यादव यांच्या सरकारच्या एक वर्षांच्या कारकिर्दीत उत्तर प्रदेशमध्ये १५० हून अधिक दंगली झाल्या आहेत. तर गेल्या दहा वर्षांत गुजरातमध्ये एकही दंगल झाली नसल्याचे सांगत उत्तर प्रदेश आणि गुजरातची तुलना करू नये, असेही मोदींनी सुनावले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची दोन रूपे आहेत. एक समाजविरोधी पक्ष आणि दुसरा सुखवादी पक्ष असल्याची टीकाही मोदी यांनी केली.