देशात मोदीलाट मुळीच नाही़  ही केवळ प्रसार माध्यमांनी उठविलेली हवा आह़े  देश कोणत्याही मोदी लाटेत वाहवणार नाही, असे मत गुरुवारी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल़े  येथील दिसपूर शासकीय शाळेतील केंद्रावर पत्नी गुरशरन कौर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी मोदीलाटेची शक्यता अमान्य केली़
काँग्रेसचा जनाधार घटत असल्याचे मला वाटत नाही़  १६ मे रोजी निकाल येईपर्यंत थांबा़  त्यानंतर आम्हीच बहुमतांनी विजयी झाल्याचे दिसून येईल, असेही पंतप्रधानांनी सांगितल़े  तसेच लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केल़े
डॉ़ सिंग १९९१ पासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करीत आहेत़  गुरुवारी सकाळी ते येथील लोकप्रिय गोपीनाथ बोडरेलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दाखल झाल़े