लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उत्साहाचे वातावरण दिसत असून सध्या एक हजार ६४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. राज्यात १०, १७ व २४ एप्रिल रोजी मतदान होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये २०१ तर दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात ३६८ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ४९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज मागे घेण्याची मुदत ९ एप्रिल आहे. गेल्यावेळी म्हणजे २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ८१९ उमेदवार रिंगणात होते.