उत्तर प्रदेशातील तीन दंगलग्रस्त गावांतील विस्थापित झालेल्या ६६ कुटुंबांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास उडाल्याचे या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
जातीय दंगलीच्या वेळी लांक, सिसौली आणि बिटावडा या गावांमधून कुटुंबीयांनी पलायन केले आणि भालवा या दुसऱ्या गावात आश्रय घेतला. तेथील गावकऱ्यांनी या कुटुंबीयांसाठी काही घरे बांधली आहेत. राजकीय नेत्यांवरील आमचा विश्वास उडाला आहे, त्यांनी केवळ आश्वासनेच दिली, कोणतीही मदत केली नाही, असे अहसान या दंगलपीडिताने सांगितले.