पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अहमदाबाद न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात शुक्रवारी मोदींना निर्दोष ठरविण्यात आले आह़े  मोदी निर्दोष असल्याचे सांगत गुजरात पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयाला अंतिम अहवाल सादर केला आह़े  त्यामुळे आता मोदींविरोधात कोणताही खटला चालविण्यात येणार नाही़ मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता़  ३० एप्रिल रोजी अहमदाबाद येथील शाळेत मतदान केल्यानंतर मोदींनी लगेचच पत्रकार परिषद घेतली होती़  त्या वेळी त्यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दाखवले होते.