News Flash

मोदींना विधानसभेत निरोप

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार सोडताना बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला .गुजरात अधिकाधिक प्रगतिपथावर जाऊ दे, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या.

| May 22, 2014 02:01 am

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार सोडताना बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला .गुजरात अधिकाधिक प्रगतिपथावर जाऊ दे, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. मुख्यमंत्री या नात्याने आपल्या हातून काही अपराध घडला असल्यास राज्यातील जनतेने तो पोटात घालावा, अशी विनंती मोदी यांनी करताच उपस्थित हेलावून गेले. मोदी यांना निरोप देण्यासाठी गुजरात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी आयोजित करण्यात आले होते. आता आपण येथून जात असून पुन्हा कधी येथे परतणार त्याची माहिती नाही असे  त्यांनी सांगितले.
आता अयोध्येत राम मंदिर उभारा -वाघेला
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता नरेंद्र मोदी यांनी घटनेच्या चौकटीत राहून अयोध्येत राम मंदिर उभारावे, अशी सूचना  विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी केल्याने काँग्रेसची  कोंडी झाली आहे.
नरेंद्र मोदी यांना गुजरात विधानसभेत बुधवारी निरोप देण्यात आला. तेव्हा काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला यांनीही मोदींचे अभिनंदन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 2:01 am

Web Title: narendra modi gets farewell in gujarat assembly
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 कठोर प्रशासकाची प्रतिमा
2 पटनाईक सलग चौथ्यांदा ओदिशाचे मुख्यमंत्री
3 BLOG: यूपीएच्या चिखलातून उमलले कमळ!
Just Now!
X