04 August 2020

News Flash

मोदी नावाच्या जपामुळे भ्रमनिरास होईल – प्रणीत कौर

शिरोमणी अकाली दल-भाजप आघाडीने मोदी नावाचा जप सुरू केला आहे तो त्यांचा भ्रम असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार रचनात्मक विकास करू शकत नाहीत

| April 27, 2014 01:46 am

शिरोमणी अकाली दल-भाजप आघाडीने मोदी नावाचा जप सुरू केला आहे तो त्यांचा भ्रम असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार रचनात्मक विकास करू शकत नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रणीत कौर यांनी केली आहे.आपल्या निवडणूक जाहीर सभेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या मोदी यांच्यावर प्रणीत कौर यांनी चांगलेच ताशेरे ओढले. लालकृष्ण अडवाणी यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली त्याचा उल्लेख करण्यास मोदी विसरले. मोदी यांचे राजकारण एककेंद्री असून तेथे लोकशाहीला वाव नाही, असेही प्रणीत कौर म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:46 am

Web Title: no modi wave pranit kaur
Next Stories
1 रामदेव बाबांविरुद्ध ‘एफआयआर’
2 भाजपच्या ‘गांधीं’चा मार्ग सोपा?
3 निवडणुकीनंतर काँग्रेसचे तिसऱ्या आघाडीला बळ?
Just Now!
X