राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘एनडीए’मध्ये कधीच प्रवेश करु देणार नाही असे थेट विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून म्हटले आहे.
निवडणूकीनंतर कोणाच्याही पाठिंब्याची गरज लागणार नाही देशात एकहाती एनडीएची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पवारांना एनडीएत घुसू देणार नसल्याचे म्हटले.
“गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि माझा शरद पवारांना एनडीएत सामील करुन घेण्यावर स्पष्ट विरोध आहे. त्यामुळे पवारांचे एनडीएत येण्याचे स्वप्न कधीच मोडकळीस आले आहे. तसेच निवडणूकीनंतर एनडीएला कोणाच्या बाहेरून पाठिंब्याची गरज लागले असे मला वाटत नाही आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मूळीच नाही. तशी गरज जरी असेल तरी हे शक्य नाही.” असेही उध्दव ठाकरे ‘सामना’तील मूलाखतीत म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या बोगस मतदानाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना उध्दव म्हणाले की, “जर बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान करणे हे जर ते लाइटली बोलत असतील तर तुम्हीच विचार करा हे लोक गांभीर्याने काय काय करीत असतील? म्हणजे याचा अर्थ शेतकऱयांच्या पदरात नेहमी काहीही न पडून सुद्धा पुन्हा मतपेटीत त्यांना मते कशी पडतात? या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत कोणालाच सापडत नव्हते ते आज खुद्द पवारांनी दिले आहे.”